🌟पाथरी तहसील कार्यालया समोर करण्यात आली जोरदार निदर्शने🌟
परभणी (दि.२५ जुलै २०२३) : मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचारासह हिंसाचाराच्या विरोधात पाथरीच्या भारतीय कम्युनिष्ट पक्षाने आज मंगळवार दि.२५ जुलै २०२३ रोजी पाथरी तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
कॉ. ज्ञानेश्वर काळे, श्रीनिवास वाकणकर, अनिता दुपटे, भारत गायकवाड, ज्ञानेश्वर रबुद, कालिदास कोल्हे, कोंडीराम घाडगे, शिवाजी लिपणे, महादेव रबुद यांच्या नेतृत्वाखालील निदर्शनकर्त्यांनी संबंधित आरोपींविरोधात कठोर पाऊले उचलावी अशी मागणी करीत केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी झाले आहे, अशी टिकाही केली.....
0 टिप्पण्या