🌟अत्यंत दुर्दैंवी घटना : तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी विजयकुमार यांची आत्महत्या.....!


🌟विजयकुमार यांनी सर्व्हिस रिवाल्वरने स्वतःवर झाडली गोळी🌟

तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी विजयकुमार यांनी आज शुक्रवार दि.०७ जुलै रोजी सकाळी ०६-५० वाजेच्या सुमारास स्वतःच्या सर्व्हिस रिवाल्वरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैंवी घटना घडली सूत्रांनी सांगितलं की विजयकुमार यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की काही आठवड्यांपासून ते नीट झोपू शकले नाहीत यावरुन असे निदर्शनास येते की श्री.विजयकुमार हे मागील काही दिवसापासून प्रचंड नैराश्यात होते. 

तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीआयजी विजय कुमार यांनी आत्महत्या केल्यामुळे प्रशासनात खळबळ माजली आहे. त्यांनी आपल्या सर्व्हिस पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडली. या घटनेच त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयपीएस अधिकारी विजय कुमार यांनी स्वत:वर गोळी का झाडली ? हे अद्याप समजू शकलेलं नाही. विजकुमार हा सन २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते त्यांनी प्रथमतः पोलीस अधिक्षक म्हणून काम केलं आहे.

विजयकुमार यांनी कांचीपुरम, कुड्डालोर, नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं होतं. याच वर्षी, विजयकुमार यांनी कोईम्बतूर रेंजचे नवीन पोलीस उपमहानिरीक्षक अर्थात डीआयजी म्हणून पदभार स्वीकारला. याआधी त्यांची शेवटची पोस्टिंग चेन्नई येथे होती जिथे त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून काम केलं.आता ज्या कोइम्बतूर रेंजमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामध्ये कोईम्बतूर ग्रामीण, तिरुपूर ग्रामीण, निलगिरी आणि इरोड जिल्ह्यांचा समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजयकुमार सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले आणि ०६-४५ वाजेच्या सुमारास त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये आले. त्यांनी त्याच्या सुरक्षा अधिकाऱ्याला (पीएसओ) आपलं पिस्तूल देण्यास सांगितलं. हे पिस्तून घेऊन ते कार्यालयातून बाहेर पडले. सकाळी ०६.५० वाजेच्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली......




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या