🌟पुर्णा शहरातील मौलाना आझाद नगर,एकबाल नगर परिसरात कोट्यावधी रुपयांच्या निधीतून उभारले नुसतेच खांब ?


🌟विद्युत खांबांवरील पथदीवे मात्र बेपत्ता : विविध प्रभागांमध्ये बोगस विकासकामे ही झाली अंदाजपत्रकांना बगल देत ?🌟


 
🌟पुर्णेत 'सोंगाड आंधळ दळतय अन् शासकीय विकासनिधीचे अक्षरशः लचके तोडणार खादीतल कुत्र पिठ खातय'असा कारभार🌟 


पुर्णा (दि.१३ जुलै २०२३) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या अनोगोंदी व भ्रष्ट कारभाराचे एक उदाहरण शोधले तर असंख्य उदाहरण मिळतील एकंदर पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा कारभारच असा झाला आहे की 'तुम्ही करा बकबक आम्ही आहोत निब्बरगट्ट' अल्पकालावधीपुर्वीच झालेल्या विकासकामांवर पुन्हा नव्याने आलेल्या विकासनिधीतून कामावर काम दाखवून विकासनिधी भ्रष्ट गुत्तेदारांमार्फत भ्रष्ट लोकप्रनिधींच्या मगरमठ्ठ जबड्यात कश्या पध्दतीने घालता येईल यात अक्षरशः पिएचडी प्राप्त सब ओव्हरसिअर नगर अभियंता अन् कुठलाही मागचा पुढचा विचार न करता स्वाक्षरी मारुन 'दे दान सुटे ग्रहाण' अश्या पध्दतीने बोगस कामांची बिल अदा करणारे मुख्याधिकारी,लेखापाल यांचे जणू काही संगणमतच आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


पुर्णा शहरातील विविध प्रभागांमध्ये झालेली कोट्यावधी रुपयांची विकासकाम भ्रष्ट गुत्तेदार अंदापत्रकांवर अक्षरशः लघुलंका केल्यागत अत्यंत निकृष्ट व बोगस काम करीत असतांना नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ,सब ओव्हरसियर संजय दिपके,नियमबाह्य नगर अभियंता सिध्दार्थ गायकवाड (नियुक्ती पद संगणक अभियंता) कुंभकर्णी झोपेत असतात की काय ? अंदाजपत्रक मंजूरी सिमेंट रोड/सिमेंट नालीला अन् प्रत्यक्षात काम हॉटमिक्स/पेव्हरब्लाकची ? 'सोंगाड आंधळ दळतय अन् शासकीय विकासनिधीचे अक्षरशः लचके तोडणार खादीतल कुत्र पिठ खातय'असा चित्रविचित्र कारभार पुर्णा नगर परिषदेतील बेईमानशाहीमुळे शहरात सर्वत्र झाल्याचे पाहावयास मिळत आहे.


पुर्णा शहरातील बसस्थानक परिसरालगत असलेल्या मौलाना आझाद नगर,एकबाल नगर,शिक्षक कॉलनी अली नगर परिसरात तर नगर परिषद प्रशासना अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीतून शेकडो विद्युत खांब बसवण्यात आली खरी परंतू या खांबावरील पथदिव्यांसह अंडरग्राऊंड केबल देखील बेपत्ता असल्यामुळे या परिसरात नागरिक रात्रीच्या वेळेला अंधारात चाचपडत या नुसत्याच उभ्या केलेल्या खांबांना धडका देत असल्याचे दिसत आहे या खांबांवर भविष्यात पथदिवे बसतील किंवा नाही ? अश्या प्रश्नार्थक मुद्रेत वावरणारे नागरिक आता या शोभेचे वास्तू ठरलेल्या विद्युत खांबांकडे पाहून पुर्णा नगर परिषदेच्या 'अंधेर नगरी चौपट राज' कारभारावर ताशेरे ओढतांना पाहावयास मिळत असून या विद्युत खांबांवर तात्काळ पथदिवे बसवण्यात यावे यावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान शेख बाबू यांनी मुख्याधिकारी पौळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे यावर मुख्याधिकारी पौळ काय निर्णय घेतात याकडे नेहमीप्रमाणे पुर्णेकरांचे नुसतेच लक्ष लागले असले तरी प्रत्येक निवेदन/तक्रार अर्जा प्रमाणे या निवेदनाला देखील मुख्याधिकारी पौळ केराची टोपली दाखवून आपल्या कर्तव्यदक्ष कारभारावर पुन्हा एक प्रश्नचिन्ह उभारतात की काय ? असाही प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण झाला आहे......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या