🌟परळी शहर पोलिस स्थानकाच्या हद्दीत कॉन्ट्रॅक्टर आत्माराम मुंडे यांची निर्घृण हत्या...!


🌟कॉन्ट्रॅक्टर मुंडे हत्या प्रकरणी परळी पोलिस स्थानकात वाचमन महेश रोडे याच्यासह अन्य एका साथीदारावर हत्येचा गुन्हा दाखल🌟

बिड (दि.०२ जुलै २०२३) - बिड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील बायपास कॉर्नरला जिरेवाडी शिवारात कॉन्ट्रॅक्टर आत्माराम उर्फ बंडू निवृत्ती मुंडे राहणार कन्हेरवाडी यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना काल शनिवार दि.०१ जुलै २०२३ रोजी उघडकीस आली होती प्राथमिक माहिती हाती आली आहे.

परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले कॉन्ट्रॅक्टर तथा शेतकरी आत्माराम मुंडे यांचे परळी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील बायपास कॉर्नरला शेत असून त्या ठिकाणी पत्राचे शेड आहे त्याच ठिकाणी त्यांची शुक्रवार दि.२९ जुन ते दि.३० जुन २०२३ च्या मध्यरात्रीच्या सुमारास हत्या झाली असल्याचे काल शनिवार दि.०१ जुलै २०२३ रोजी उघड झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलीस स्थानकाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिस पथकाने घटना स्थळ पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला परळी पोलिस स्थानकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी बिड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर व पोलीस उपाधिक्षक चोरमले यांना देऊन ते आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, गोविंद कांदे गोविंद एलमा विष्णू फड पंडित पांचाळ यांच्यासह त्वरित दाखल झाले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

या हत्येच्या घटने संदर्भात मयत आत्माराम मुंडे यांचे बंधू शिवाजी निवृत्ती मुंडे राहणार कन्हेरवाडी तालुका परळी यांच्या फिर्यादीनुसार संशयित मयत मुंडे यांचा वाचमन महेश नामदेव रोडे व दुसरा आरोपी पवन भिमराव रोडे दोघेही राहणार कन्हेरवाडी तालुका परळी यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गु र नंबर १२८/२०२३ कलम ३०२, ३४ भादवी नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी मयत आत्माराम उर्फ बंह मुंडे यांची इनोव्हा कार क्रमांक एम एच ४५/ झेड ০१११ सह फरार झाले आहेत. संशयित आरोपींनी गुत्तेदार आत्माराम मुंहे यांची हत्या का किली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास ठाण्याचे प्रभारी चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ हे करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या