🌟पुर्णा तहसिलचा अजब कारभार : निवडणूक बैठकीस गैरहजर असणाऱ्या बिएलओंसह उपस्थितांनाही कारणे दाखवा नोटीसा..!


🌟निवडणूक बैठकीस गैरहजर राहणाऱ्या १८ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा यातील अनेकांची बैठकीला प्रत्यक्ष उपस्थिती🌟


 
पुर्णा (दि.१३ जुलै २०२३) :- पुर्णा तहसिल मधील निवडणूक विभागात कार्यरत नायब तहसिलदार तथा निवडणूक विभागाचे प्रमुख डि.व्ही.कोकाटे व वरिष्ठ सहाय्यक चांदणे यांचा अनागोंदी कारभार नुकताच उघडकीस आला असून दि.०७ जुलै २०२३ रोजी तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागात शिक्षक अर्थात ज्यांच्या बिएलओचा कारभार सोपवलेला आहे त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला गैरहजर राहिल्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी १८ बिएलओंना दि.११ जुलै २०२३ रोजी जा.क्र.२०२३/निवडणूक/कावि तहसिल कार्यालय पुर्णा अंतर्गत 'कारणे दाखवा नोटीसा' बजावण्यात आल्या ज्यावर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांची स्वाक्षरी आहे सदरील नोटीसा बजावलेल्या १८ शिक्षक (बिएलओ) मध्ये अश्याही शिक्षकांचा समावेश आहे जे या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होतेव ज्यांनी रजिष्टरवर स्वाक्षरी देखील मारलेली आहे आपण बैठकीला उपस्थित असतांना देखील कारणे दाखवा नोटीसच्या यादीत आपल्याही नावाचा समावेश असल्यामुळे व प्रसिध्दी माध्यमांनी देखील याची शहानिशा न करता वृत्त प्रकाशित केल्यामुळे यातील बऱ्याच शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला.


 या संदर्भात सविस्तर वृत्त असे की भारत निवडणूक आयोगाच्या २३ मे २०२३ पत्राच्या निर्देशानुसार दि.०१ जानेवारी २०२४ पासून छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम राबवण्याचे घोषित केले आहे. यामध्ये नवीन मतदार, मतदारांच स्थलांतर, मयत मतदार, मतदारांच्या नावातील दुरुस्ती आधी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित शिक्षकांनी घरोघरी जाऊन डाटा संक्षिप्त करणे गरजेचे असल्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या आदेशानुसार दि.०७ जुलै २०२३ रोजी तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला काही शिक्षकांना वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे तर काहींच्या मागे शाळेतील कामे असल्यामुळे अनेकांना या बैठकीस कदाचित उपस्थित राहता आले नसावे या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमानुसार कारणे दाखवा नोटीसा बजावने ठिक होते परंतु सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या शिक्षकांची कुठलीही चौकशी नकरता १८ शिक्षकांना गैरहजेरी लावल्या प्रकरणी निवडणूक अधिनियम १९५१ कलम १३४ अन्वये व निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई का करण्यात येऊ नये. या अनुषंगाने संबंधित शिक्षकांना तहसील प्रशासनाने नोटीसा बजावल्या व त्यांना आपले म्हणणे मांडण्यास २४ तासाचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे जे शिक्षक बैठकीला हजर होते त्यांचाही गैरहजर राहणाऱ्यांच्या यादीत समावेश झाल्यामुळे तहसिल प्रशासनाचा गलथान कारभार तर उघडकीस आलाच परंतु त्या बिचाऱ्या शिक्षकांना मात्र नायक मनस्ताप सहन करावा लागत आहे.......   


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या