🌟राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हान यांनी घेतली मा.जिल्हा परिषद सदस्य दिगंबरराव कऱ्हाळे यांची भेट...!


🌟परभणी जिल्हा उपाध्यक्ष दिगंबरराव कऱ्हाळे यांच्या पुर्णेतील निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचा सत्कार🌟

परभणी/पुर्णा (दि.०१ आगस्ट २०२३) - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी काल सोमवार दि.३१ जुलै २०२३ रोजी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबरराव कऱ्हाळे यांच्या पुर्णेतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

त्याप्रसंगी त्यांचे कऱ्हाळे कुटुंब तसेच असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हान यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले यावेळी उभयंतांनी राज्यातील राजकीय घडामोडींसह जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पक्ष बांधणी संदर्भात देखील चर्चा केली....  ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या