🌟परभणी जिल्हा प्रशासनामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला🌟
परभणी (दि.१४ जुलै २०२३) : परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर दि.०३ जुलै २०२३ रोजी भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्त झाले. स्वेच्छानिवृत्ती नंतर ते प्रथमच परभणी जिल्ह्यात आले असता, परभणी जिल्हा प्रशासनामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्पप संचालक रश्मी खांडेकर यांनी यावेळी सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सेवा कालावधीत केलेल्या उल्लेखनिय कार्याची तसेच त्यांच्या सोबत काम करतांना आलेल्या अनुभवाची माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती....
0 टिप्पण्या