🌟पुर्णा तालुक्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊसासह गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासन आर्थिक मदत केव्हा देणार ?


🌟संतप्त शेतकऱ्यांचा शासनाला खडा सवाल : महसुल प्रशासनाला दिले निवेदन🌟


पुर्णा (दि.२५ जुलै २०२३) - पुर्णा तालुक्यात मागील मार्च २०२३ या महिण्यात अवकाळी पाऊसासह गारपीठ झाली होती यावेळी तालुक्यातील मौ.बरबडी,सूहागण,आव्हई या गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ज्या नुकसानीची महसुल प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी देखील झाली होती परंतु तब्बल पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील शासनाकडून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत देण्यात आलेली नाही त्यामुळे मौ.बरबडी,सूहागण,आव्हई येथील संतप्त शेतकऱ्यांनी काल सोमवार दि.२४ जुलै २०२३ रोजी राज रावसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुर्णेचे तहसिलदार बोथीकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली यावेळी या गावांतील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते..... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या