🌟हिंगोली जिल्ह्यात एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही असे नियोजन करावे - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


🌟जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मिशन इंद्रधनुष्य मोहिम राबविण्यासाठी बैठक संपन्न🌟


हिंगोली (दि.14 जुलै 2023) : जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष्य मोहिम 5.0 अंतर्गत 0 ते 6 वयोगटातील लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी ज्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांचे सर्व्हे करुन बालकांची शोध घ्यावा व एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही असे नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिले. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली मिशन इंद्रधनुष्य मोहिम राबविण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची दि.13 जुलै, 2023 रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  गणेश वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. मंगेश टेहरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी  डॉ. सतीश रुणवाल, समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जागतिक आरोग्य संघटनाचे प्रतिनिधी डॉ.मुजीब, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, विस्तार अधिकारी कमलेश ईशी, सुनील मुनेश्वर, डी. आर. पारडकर, मुनाफ आदी उपस्थित होते. 

  यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. मुजीब यांनी बालकांमधील मृत्यू ,आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात  अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. केंद्र शासनाने डिसेंबर, 2023 पर्यंत गोवर रुबेला आजाराची दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी केंद्र शासनाने माहे ऑगस्ट 2023 पासून  तीन फेऱ्यांमध्ये सर्व जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेली किंवा अर्धवट लसीकरण झालेले सर्व बालकांचे लसीकरण करुन घेण्यात येणार आहे. हे लसीकरण तीन टप्प्यात करण्यात येणार असल्याची माहिती दिली. 

पहिला टप्प्याची मोहिम ऑगस्टमध्ये राबविण्यात येणार आहे. या महिन्यात 1 ते 12 ऑगस्ट, 2023 या दरम्यान विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यातील दि. 11 ते 16 सप्टेंबर, 2023 या कालावधीत व तिसऱ्या टप्प्यातील ऑक्टोबर महिन्यात दि. 9 ते 14 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम प्रत्येक महिन्यात सहा कामकाजाचे दिवसांमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये लाभार्थ्याची निवड करुन 0 ते 2 वर्षे (0 ते 23 महिने) वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्यांचे सर्व लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.  2 ते 5: वर्ष वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. गर्भवती महिला यांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. दि. 6 ऑगस्ट,2018 किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकाचा यामध्ये समावेश असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या