🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळसात जलजीवन मिशन योजनेच्या अर्धवट कामांमुळे रस्त्यांचे चिखलमय पांदन रस्त्यात रुपांतर...!


🌟गावातील अबाल वृद्ध शाळा/महाविद्यालयांतील विद्यार्थी विद्यार्थीनींना लहान मुल महिलांना या रस्त्यांवरून जातांना प्रचंड त्रास🌟


पुर्णा (दि.२३ जुलै २०२३) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस ग्राम पंचायत प्रशासनाला शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ०९ कोटी ०२ लाख ८१ हजार ४०० रुपयांचा निधी ग्रामीण पाणीपुरवठा विभागा मार्फत मंजूर करण्यात आला सदरील योजनेच्या कामाला जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एप्रिल २०२३ या महिण्यात सुरुवात करण्यात आली त्यामुळे जलजीवन मिशन या योजने अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन जोडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुर्वीचे चांगल्या पेव्हरब्लॉक बसवलेल्या तसेच सिमेंट रस्त्यांवर खोदकाम केल्यामुळे भर पावसाळ्यात या रस्त्यांचे रुपांतर अक्षरशः चिखलमय खड्डेयुक्त पांदन रस्त्यात झाल्याचे निदर्शनास येत आहे.


[ताडकळस ग्रामपंचायत परिसरात देखील अत्यंत बिकट अवस्था झाल्याचे दिसत असून यालाच म्हणतात 'दिव्या खाली अंधार']


       या संदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा तालुक्यातील ताडकळस गाव मुख्य बाजारपेठ व सर्वात जास्त लोकसंख्येचे गाव आहे साधारणता या गावाची लोकसंख्या बारा पंधरा हजार इतकी आहे पुर्णा तालुक्यात सर्वात मोठी १५ सदस्याची ग्रामपंचायत असलेली ताडकळस ग्रामपंचायत सातत्याने चर्चेत राहणारी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायती अंतर्गत तब्बल बारा ते पंधरा हजार लोकसंख्या पाहता ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत या गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत शासनाने 'हर घर नल,जल जीवन मिशन योजने' अंतर्गत तब्बल ०९ कोटी ०२ लाख ८१ हजार ४०० रुपयांचा निधी मंजूर निधीतील रक्कम ग्रामपंचायतीला प्राप्त होण्यापुर्वीच मागील एप्रिल २०२३ या महिण्यात जिल्हा परिषद निवडणूकीची कुणकूण लागताच ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या या कामाची जल्लोशात सुरुवात झाल्याचे नाट्य रंगवत गावातील गल्लीबोळ्या मध्ये ९०% खोदकाम जनतेची कसल्याही प्रकारची रहदारीची तमा न बाळगता करण्यात येवून केवळ पाणीपुरवठा पाईपलाईनच्या छड्या अंथरण्याचे काम करण्यात आले त्यामुळे गावातील चांगल्या रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली पावसाळ्याला सुरुवात होऊन जोरदार पाऊस सुरु झाल्याने या रस्त्यांवरून मार्गक्रमण करते वेळेस गावातील अबाल वृद्ध शाळा/महाविद्यालयांतील विद्यार्थि विद्यार्थीनींना लहान मुल माता भगिनींना या रस्त्यांवरून जातांना प्रचंड त्रास सहन करीत चिखल तुडवत खड्यांतून भितभीत चालावे लागत आहे.


 त्यामुळे या चिखलमय झालेल्या रस्त्यांची किमान डागडूजी करून निदान त्यावर मुरूम तरी टाकून चालण्या योग्य रस्ता करून द्यावा अशी ताडकळस येथील नागरिकांकडून ग्रामपंचायत कडे वेळोवेळी मागणी होत आहे परंतु ग्रामपंचायत काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये असे दिसून येत आहे ताडकस गावातील अत्यंत महत्वाचा प्रभाग समजल्या जाणाऱ्या वार्ड क्रमांक ०३ हा आजी/माजी जिल्हा परिषद सदस्यांचा प्रभाग असून हा जिल्हा परिषद सदस्य तसेच आजी/माजी सरपंचांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो परंतु या भागाचा विकास शून्यच असून वार्ड क्रमांक ०३ मधून निवडून आलेले सदस्य हे सरपंच ही आहेत आणि उपसरपंच ही आहेत तसेच वार्ड क्रमांक ०३ मधूनच निवडून आलेले प्रतिनिधी ही जिल्हा परिषद सदस्य होते परंतु याच वार्डामध्ये सर्वात जास्त घाणीचे साम्राज्य व सुविधांचा अभाव दिसून येत आहे त्यामुळे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर येथील नागरिक नाराजी व्यक्त करत आहे......

----------------------------------------------------------------------

* वारे जलजीवन मिशन ? हे तर चांगल्या रस्त्यांचे मनमानी पध्दतीने खोदकाम भिषण ? 


हर घर नल,हर घर जल...जल जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत  तब्बल ०९ कोटी ०२ लाख ८१ हजार ४०० रुपयांचा निधी मंजूर ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पुर्णा विभागाचे उप अभियंता यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार अद्याप पर्यंत या योजनेवर ताडकळस ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठलाही खर्च झाला नसल्याचे दाखवण्यात येते मग ताडकळस ग्रामपंचायत प्रशासनाने या योजनेच्या नावावर पाणीपुरवठा पाईप लाईन टाकण्यासाठी संपूर्ण गावात जेसीबीने खोदकाम करीत पाईप लाईन टाकण्याचे धाडस कोणत्या निधीतून व कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशाने करीत गावातील रस्त्यांचे उत्खनन केले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या