🌟निवडणूकी करीता सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी बारा महिन्यांची मुदतवाढ....!


🌟अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या मुदतीच्या आत जात वैधता दाखल करण्यासाठी मुदतवाढ🌟

परभणी (दि.11 जुलै 2023) : शासनाने सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 6, दिनांक 10 जुलै, 2023 अन्वये 1 जानेवारी, 2021 किंवा त्यानंतर आणि सदर अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापर्यंत घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुका लढण्यासाठी ज्या व्यक्तीने जातीचे वैधता प्रमाणपत्र दाखल केले नसेल, अशा व्यक्तींना अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या मुदतीच्या आत जात वैधता दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

तसेच सदर अध्यादेशातील कलम 3 (1) (ख) मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याबद्दल ज्या व्यक्तीची निवड रद्द करण्यात आली आहे. किंवा रद्द करण्यात आली असल्याचे मानण्यात आले आहे. तो व्यक्ती अथवा जी व्यक्ती, ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा सरपंच असल्याचे मानण्यात येईल आणि असा सदस्य किंवा सरपंच म्हणून नियमित असेल आणि वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याबद्दल सदर अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या मुदतीपर्यंत ती व्यक्ती निरर्ह ठरणार नसल्याचे उपजिल्हाधिकारी साप्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वो कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या