🌟पुर्णा सहकारी साखर कारखाना निवडनुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार....!


🌟पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती व शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न🌟


पुर्णा (दि.१२ जुलै २०२३) - पुर्णा सहकारी साखर कारखाना वसमतच्या सार्वत्रिक निवडनुकित काल मंगळवार दि.११ जुलै रोजी बहुमताने निवडून आलेल्या महाविकास आघाड़ीचे विजयी उमेदवार शाहजी देसाई,भगवानराव धस,माऊली वंजे,श्रीधर पारवे यांच्या सत्काराचे आयोजन आज बुधवार दि.१२ जुलै २०२३ रोजी पुर्णेतील कृऊबा समिती सभागृहात शिवसेना व पुर्णा कृषी बाजार समितीच्या वतीने करण्यात आले होते.

या सत्कार सोहळ्यावेळी शिवसेना (उबाठा) परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम,शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले,शिवसेना (उबाठा) पुर्णा तालुका प्रमुख काशीनाथ कालबाडे, पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापति बालाजी खैरे,उपसभापति नारायण पिसाळ,संचालक बालाजी वैद्य, रमेश कालबांडे, छबु लोखंडे,रमेश ठाकुर,लक्ष्मणराव बोबडे मामा माजी उपसभापति,कुंडलिक मोरे,गणेश चेअरमन,गोविंद सोलव उपतालुका प्रमुख,राम भालेराव,संजय कदम,राजू कुर्हे,माधव धवन आदींसह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या