🌟कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना जमीन वाटप आदेशाचे वितरण...!


🌟यावेळी कार्यक्रमास गटविकास अधिकारी पियुष केंद्रेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟

परभणी (दि.07 जुलै 2023) : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना जमीन वाटप आदेशाचे वितरण करणेबाबतचा कार्यक्रम दिनांक 30 जुन 2023 रोजी समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परभणी येथील सभागृहात संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमास गटविकास अधिकारी पियुष केंद्रेकर,पुर्णा येथील सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी पानपट्टे, अनिता आसेवार, सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगीरे, समाजकल्याण अधिकारी अमित घवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व दिपप्रज्वलन करुन शाहीर काशीनाथ उबाळे यांच्या पथकाने सादर केलेल्या महाराष्ट्र राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या स्वागत प्रसंगी शाहीर काशीनाथ उबाळे यांच्या पथकाने स्वागत गीतानंतर महिला सबळीकरण गीत सादर केले.

या कार्यक्रमात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना उत्पन्नाचे स्तोत्र उपलब्ध व्हावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा याकरिता 100 टक्के अनुदानावर 2 एकर बागायती जमीन वाटपाचे आदेश रुक्मीन पूजा चव्हाण, वंदना बाबासाहेब तुपसमुद्रे, मनीषा अशोक वाव्हळे व सतीश कुमार वाघमारे सर्व रा. मौजे वझुर बु. ता. मानवत ह्या चार लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात वितरीत करुन श्रीमती सोनकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शाहीर काशीनाथ उबाळे यांच्या पथकाचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी शिवानंद मिनगीरे यांनी आभार प्रदर्शन केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश पेडगावकर, कांचन त्र्यंबकराव कत्रुवार, कर्णबधीर विद्यालय, परभणी यांनी केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचे लाभार्थी, सामाजिक कार्यकर्ते आयुक्त, समाजकल्याण परभणी यांचे कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या