🌟जिंतूर महामार्ग पोलीस निरीक्षक केंद्रे यांना निरोप तर नविन आलेले जाधव यांचे कर्मचाऱ्यांनी केले स्वागत.....!


🌟सदर कार्यक्रम जिंतूर येथील स्वागत हॉटेल येथे पार पडला🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर  :- महामार्ग पोलिस केंद्र जिंतूर येथील अधिकारी सा.पो.निरीक्षक श्री.लक्ष्मण केंद्रे यांची बदली महामार्ग पोलिस केंद्र देगलूर, नांदेड झाली आहेत व पो.उपनिरीक्षक श्री.लक्ष्मण मुरकुटे  यांची बदली महामार्ग पोलिस केंद्र परभणी येथे झाल्याने त्यांना निरोप समारंभ पार पडला,

 त्याच सोबत नवीन आलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.जाधव व पोलीस उपनिरीक्षक श्री.इनामदार यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम झाला. सदर कार्यक्रम जिंतूर येथील स्वागत हॉटेल येथे पार पडला. कार्यक्रमाला महामार्ग जिंतूर येथील पोलिस उपनिरीक्षक कदम, सा.उपनिरीक्षक सीध्दिकी,पो.ह. सचिन गुरसूडकर, पो.ह. विशाल ठाकूर, पो ह शकील, पोशि. गिराम अदि कर्मचारी हजर होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या