🌟लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप🌟
🌟कार्यक्रमात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे ही वाटप🌟
🌟ईर्शाळवाडी व समृध्दी महामार्गावरील बळींना श्रध्दांजली🌟
🌟लवकरच शिवाजी विद्यालय स्कूल शूज चे वितरण🌟
अकोला (दि.३० जुलै २०२३) - सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत पत्रकारांच्या कल्याणकारी प्रश्नांबाबत समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थांना शालेय साहित्य वितरण आणि मोतीबिंदू व आरोग्य शिबीरे तथा अनेक सामाजिक उपक्रम स्तूत्य आणि अभिनंदनीय आहेत.पत्रकार लोक सामाजिक संवेदनशीलतेने समाजासाठी सुध्दा एवढे सुंदर उपक्रम राबवितात हे येथे पहायला मिळाले.असे भावोग्दार अकोला जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.आरती कुलवाल यांनी व्यक्त केले. अतिथी सन्मानपत्रांचेही त्यांनी कौतुक केले.सुरेशकुमारजी खंडेलवाल यांनीही वाटचालीचे कौतुक करून १५० नोटबुक दिले, आणि अशा उपक्रमांना सहकार्याचे अभिवचन दिले.यावेळी सर्वप्रथम सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबांना हारार्पण वंदन करून वंदन करण्यात आले.ईर्शाळवाडी आणि समृध्दी महामार्गावरील पिंपळगाव नजीकच्या अपघातातील बळींना याप्रसंगी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या २३ व्या विचारमंथन मेळाव्यात प्रत्येकी ६ नोटबुक,कंपास,पेन अशा शालेय साहित्याचे ५५ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.त्यावेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अकोल्यातील पर्यावरण मित्र,उद्योजक विवेकजी पारसकर,जनता बॅंक संचालक,खंडेलवाल समाजाचे माजी अध्यक्ष सुरेशकुमारजी खंडेलवाल प्रमुख अतिथी म्हणून तर केन्द्रीय मार्गदर्शक,साहित्य व संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराजजी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्रदान करून त्यांना अल्पोपहार देण्यात आला. उपस्थित अतिथींना याप्रसंगी सन्मानपत्र,शाल ,पुस्तके आणि वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.
विदर्भ विभागीय संघटक तथा संपर्क प्रमुख म्हणून अमरावतीच्या पि.एन. उर्फ रावसाहेब देशमुख यांना व डिजीटल मिडिया ग्रूपच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त झालेल्या रामकृष्ण डोंगरे यांना नियुक्तीपत्र,आय कार्ड आणि शाल व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.विजयराव देशमुख यांना पुण्याचा मनिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार तर के.व्ही देशमुख यांना आय कार्ड प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था सांभाळणारे समाजसेवक राजेश मोरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला विवेकजी पारसकर यांनी सुरूवातीलाच भेट देऊन उपक्रम आणि कार्यक्रमाच्या पध्दतीची प्रशंसा केली. मुख्याध्यापक मनोज देशमुख यांच्या बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमात केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,उपाध्यक्ष किशोर मानकर,प्रा.राजाभाऊ देशमुख,अंबादास तल्हार,संदिप देशमुख,विजयराव देशमुख, डॉ.विनय दांदळे,के.व्ही.देशमुख, रावसाहेब देशमुख( अमरावती) डॉ.शंकरराव सांगळे,विवेक मेतकर,दिपक देशपांडे,सौ.किर्ती मिश्रा,अशोककुमार पंड्या,शामराव देशमुख, सतिश देशमुख,विजयराव बाहकर,सागर लोडम,के.एम.देशमुख,मनोहर मोहोड,दिलीप नवले,सतिश अ.देशमुख,राजेश मोरे,पंकज देशमुख,रविन्द्र देशमुख,डॉ.अशोकराव सिरसाट,रामकृष्ण डोंगरे, तथा विद्यार्थी आणि त्यांचे काही पालक उपस्थित होते.सचिव राजेन्द्र देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.......
============================
0 टिप्पण्या