🌟गंगाखेड येथील देशमाने कंप्यूटरचे संचालक सुहास देशमाने सेट परीक्षा ऊत्तीर्ण...!


🌟काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केला सत्कार : देशमानेंच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे🌟

गंगाखेड (दि.०१ जुलै २०२३) : येथील देशमाने कंप्यूटरचे संचालक सुहास देशमाने महाराष्ट्र सेट परीक्षा ऊत्तीर्ण झाले आहेत आपला व्यवसाय सांभाळून देशमाने यांनी संपादन केलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे. 

शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य पात्रता परिक्षेस ( सेट ) अनन्यसाधारण महत्व आहे. मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून हिंदी विषायात सुहास देशमाने हे ऊत्तीर्ण झाले आहेत. आज कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, श्री साई सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष नागेश पैठणकर, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धोधन भालेराव, ऊदय शिसोदिया, सुमित देशमाने यांच्या ऊपस्थितीत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. धुत यांचेसह सर्व प्राध्यापक वृंद, प्राचार्य डॉ. अनिल सिनगारे, पत्रकार प्रमोद साळवे, अनंतकुमार मुंडे सर, राजेश जवादे, शेख फारोख, किशन शिंदे, विनायक लोखंडे, सलीममामा आदिंनी अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या