🌟दिल्ली येथे संपर्क क्रांती एक्स्प्रेसने जमात साठी जाणाऱ्या प्रवास्याची विसरलेली बॅग नातेवाईकांच्या स्वाधीन...!


🌟प्रवासी सेना लोहमार्ग पोलिस रेल्वे सुरक्षा बलाचे कौतुकास्पद कार्य🌟

 छ.संभाजी नगर (दि.२५ जुलै २०२३) - छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील शेख शफीक शेख मजीद राह हे दिल्ली येथे जमात करीता मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस मधून जात असतांना त्यांची बॅग छ संभाजी नगर रेल्वे स्टेशन येथे विसरली होती सदरील बॅगेत २० हजार रोख रक्कम,कपडे व इतर सामान होते.


या प्रवास्याची विसरलेली बॅग शोधून त्यांनी विनंती केल्यावरून नातेवाईक यांना सुपुर्द करण्यात आली यावेळी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी,लोहमार्ग पोलिस दलाचे हेड कॉन्स्टेबल दिघुळे,पो.कॉ.अमोल शिरसाट,महिला पोलिस कर्मचारी धरती ठवकर,रविकांता परिहार यांनी विशेष सेवाकार्य केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या