🌟....ओ जानेवाले हो सके तो लौट के आजा : एकुलता एक सुपुत्र गेल्यानंतर देखील धिरजकुमारच्या वडिलांनी धिर सोडला नाही...!


🌟कुटुंबाची जवाबदारी ८२ वर्षीय वडिलांनी स्वतःच्या खांद्यावर घेत संपूर्ण कुटुंबाला सावरले🌟


🌟शोकाकूल राठोड कुटुंबाकडून धिरजकुमार यांचा ५५ वा वाढदिवस आज त्यांच्या पश्चात डोळ्यातील अश्रूंच्या साक्षीने साजरा🌟 

दक्षिण मध्य रेल्वेतील सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी श्री.दशरथदास राठोड त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शकुंतलाबाई राठोड हे राठोड कुटुंब म्हणजे परिसरातील अत्यंत मनमिळावू तसेच सुखी समृध्द कुटुंब दक्षिण मध्य रेल्वे नांदेड डिव्हीजन मध्ये यशस्वीपणे सेवा बजावत निवृत्त झालेल्या दशरथदास राठोड यांना एक मुलगा धिरजकुमार व एक मुलगी शितल 'हम दो हमारे दो' असे हे लहान कुटुंब सर्वकाही सुरळीत चालत असतांना सेवानिवृत्त दशरथदास राठोड यांच्या या कुटुंबाला दैवाचीच दृष्ट लागाल्या प्रमाणे त्यांची पत्नी सौ.शकुंतलाबाई यांचे सन २००९ यावर्षी निधन झाले यानंतर अवघे दशकही संपले नाही तोच एकुलता एक मुलगा धिरजकुमार राठोड यांचे २०२० यावर्षी वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी दुःखद निधन झाले यानंतर कुटुंबाची सर्व जवाबदारी वयोवृध्द ८२ वर्षीय दशरथदास (काका) यांच्यावर आली.


स्वर्गीय धिरजकुमार राठोड यांचा आज ५५ वा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या सुविद्य पत्नी सरीता धिरजकुमार राठोड,मुल पंकज धिरजकुमार राठोड,कृष्णा धिरजकुमार राठोड व वयोवृध्द वडील दशरथदास राठोड यांनी त्यांचा ५५ वा वाढदिवस त्यांच्या पश्चात डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून देत साजरा केला धिरजकुमारच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाची जवाबदारी सांभाळत मुलांचे शिक्षण पुर्ण केले धिरजकुमार माझा देखील वर्ग मित्र असल्यामुळे त्यांचा मुलगा पंकजने मला पप्पांचा आज ५५ वा वाढदिवस असल्याचे सांगितले लहाणपणापासूनच अत्यंत शांत व मनमिळावू स्वभाव असलेल्या धिरजकुमारने कधीही कोणा विषयी मनात द्वेषभावना ठेवली नाही हयात असे पर्यंत प्रत्येकाशी अत्यंत चांगले व प्रेमाचे नाते जोपासले त्यामुळे धिरजकुमार या जगातून निघून गेला यावर अजुनही विश्वास बसत नाही आज त्याचा ५५ वा वाढदिवस अत्यंत कमी वयात जगाचा निरोप घेऊन निघून गेलेल्या धिरजकुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा शेवटी द्यावे तरी कशा ? त्याच्या आठवणी राठोड कुटुंबच काय तर मित्र परिवार देखील कधीही विसरणार नाही...शेवटी त्या गाण्याचे बोल निश्चितच आठवतात....ओ जाणेवाले हो सके तो लौट के आणा...ये घाट तू ये बाट कहीं भूल न जाना....  

स्वर्गीय धिरजकुमार राठोड यांना ५५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसह विनंम्र आदरांजली......  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या