🌟नियमबाह्य पद्धतीने पावसाळ्यामध्ये डांबरी रस्ते करणाऱ्या कंत्राटदार व अभियंतांची चौकशी करून कठोर कारवाई करा...!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी🌟


परभणी (दि.११ जुलै २०२३) - परभणी शहरात सध्या महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर डांबरी रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्य शासन, केंद्र शासन व बांधकाम विभागाच्या नियमानुसार जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे असल्याने व पावसात केलेले डांबरी रस्ते टिकत नसल्याने या चार महिन्यांमध्ये डांबरीकरणाचे कुठलेही काम करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश व शासन निर्णय असताना देखील व याचा कंत्राटदारांच्या कार्यारंभ आदेशावर स्पष्ट उल्लेख केलेला असतानाही परभणी शहर महानगरपालिका हद्दीमध्ये मागील पंधरा दिवसात दहा ते पंधरा ठिकाणी डांबरी रस्ते करण्यात आले. ही एक गंभीर बाब आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यात रस्ते करणाऱ्या कंत्राटदार आणि महानगरपालिकेचे अभियंते यांची चौकशी करून कंत्राटदारांना काळया यादीत टाकावे व संबंधित अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित कामाच्या दर्जाची गुणवत्ता चाचणी करावी अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन त्यांना सादर केले. मा. जिल्हाधिकारी मॅडम यांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. गोविंद रणवीरकर यांनी निवेदन स्वीकारले.

शहरात रस्ते होत आहेत ही जरी चांगली बाब असली तरी पावसाळ्यात केलेले डांबरी रस्ते टिकाऊ नसतात. संपूर्ण उन्हाळा महानगर पालिका झोपेत होती का असा ही प्रश्न निर्माण होतो. असे ही या निवेदनात म्हटले आहे निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा.ना. एकनाथ शिंदे साहेब व आयुक्त, परभणी शहर महानगरपालिका यांना पण देण्यात आल्या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, मीडिया प्रभारी नकुल होगे, सरचिटणीस ॲड. सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, बाळा नरवाडे, शहर चिटणीस वैभव संघई, रामेश्वर पुरी, दीपक भुस, शेख बशीर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या