🌟परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात पावसाने उघडिप दिल्याने शेती कामांना वेग...!


🌟सोयाबीन कोळपणी फवारणी, निंदण आदी कामांना वेग आला आहे🌟

परभणी/पालम (दि.३१ जुलै २०२३) - मागील काही दिवसांपासून पालम तालुक्यातील व परिसरामध्ये संततधार पावसाने झोडपून काढले होते. मात्र मागील दोन ते तिन दिवसांपासून पावसाने उघडिप दिल्याने परिसरामध्ये शेतीच्या कामांना वेग आला आहे.

परिसरामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने येथील लोक मोठ्या प्रमाणामध्ये शेती व्यवसाय करतात. मागील आठवड्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळे शेतातील कामे रखडली होती. मात्र २८ व २९ 30 जुलै रोजी पावसाने उघडिप दिल्याने शेती कामांना वेग आला आहे. त्यामध्ये सोयाबीन कोळपणी फवारणी, निंदण आदी कामांना वेग आला आहे. संततधार पावसामुळे शेतामध्ये गवत मोठ्या प्रमाणात आहे.

निघाले असून काही ठिकाणी तर पिके खाली आणि गवत पिकांच्या वर गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. काही ठिकाणी तणनाशक फवारणी करण्यात येत आहे. बहुतांश शेतकरी शेतीमध्ये काम करताना पहावयास मिळत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या