🌟जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली🌟
परभणी (दि.२१ जुलै २०२३) : परभणीच्या जिल्हाधिकारी सौ. आंचल गोयल यांची नागपूर येथील महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली असून या रिक्त जागी नंदूरबार येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी राज्यातील आयएएस दर्जाच्या 31 अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून त्यात परभणीतील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सौ. आंचल गोयल यांचाही समावेश आहे. गोयल यांची नागपूरात महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या