🌟बिड जिल्ह्यातील परळी शहर पोलिस स्थानकाच्या हद्दीत शिवारात कॉन्ट्रॅक्टर आत्माराम मुंडे यांची निर्घृण हत्या....!


🌟दरम्यान संपूर्ण पोलिस तपासानंतर या घटनेची सविस्तर माहिती समोर येईल🌟

बिड/परळी (दि.०१ जुलै २०२३) : बिड जिल्ह्यातील परळी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बायपास कॉर्नरला जिरेवाडी शिवारात कॉन्ट्रॅक्टर (गुत्तेदार) आत्माराम उर्फ बंडू मुंडे वय वर्षे ५४ राहणार कन्हेरवाडी यांची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 

पोलिस सुत्रांकडून प्राथमिक प्राप्त माहितीनुसार आत्माराम (बंडू) मुंडे हे काल शुक्रवार दि.३० जुन २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास घरातून गेले होते. आत्माराम मुंडे यांचे बायपास कॉर्नरला शेत असून त्या ठिकाणी पत्राचे शेड आहे. त्याच ठिकाणी त्यांचा मुतदेह आढळून आला आहे. प्रथमदर्शनी त्यांचा खून झाला असल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी परळी शहर पोलिस स्थानकाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. ही हत्येची घटना नेमकी का व कोणत्या कारणांमुळे घडली असावी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने खळबळ उडाली आहे.परळी शहर पोलिस स्थानकात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नाही.घटनास्थळावर पोलिस तपासाची प्रक्रिया सुरु आहे.दरम्यान संपूर्ण पोलिस तपासानंतर या घटनेची सविस्तर माहिती समोर येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या