🌟परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन....!


🌟असे आवाहन कृषी आयुक्ति सुनील चव्हांण यांनी केले आहे🌟 

परभणी (दि.२४ जुलै २०२३) : खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ असल्यामुळे राज्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.


राज्याचे आजपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ४६३.८ मिमी असून, या खरीप हंगामात आतापर्यंत प्रत्यक्षात ४५७.८ मिमी (सरासरी ९९%) एवढा पाऊस पडला आहे.  खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणी क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून, प्रत्यक्षात ११४.६४लाख  हेक्टर (८१ टक्के)क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीच्या कामास वेग आला असून, प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तुरीची पेरणी तसेच भाताच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. आजघडीला राज्यात सोयाबीन पिकाची ४४.०८ लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस  ३९.८८ लाख हे., तूर ९.६६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची ६.६९ लाख हेक्टरवर पुनर्लागवड झाली आहे.

खरीप हंगाम २०२३साठी १९.२१ लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १९.३० लाख क्विंटल (१००टक्के) बियाणे पुरवठा झाला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामाकरिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे तसेच पावती व टॅग जपून ठेवणे आवश्यक आहे.

खरीप हंगाम २०२३ करिता राज्यास ४३.१३ लाख मेट्रिक टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून  आतापर्यंत ५०.४० लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध  झाला आहे. त्यापैकी २३.८८ लाख मेट्रिक टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात २६.५२ लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

कृषी विभागामार्फत खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटकनाशके किंवा बियाणे याबाबत तक्रार असल्यास ८४४६११७५००, ८४४६२२१७५०, ८४४६३३१७५० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच राज्या चे  कृषी मंत्री  धनंजय मुंडे यांनी निर्देशित केल्याधप्रमाणे बियाणे,  खते व कीटकनाशके लिंकींग / निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४ X७ कार्यरत राहील. या संदर्भातील तक्रार शेतकऱ्यांना ९८२२४४६६५५ या व्हाट्सअॅप क्रमांकावर केवळ व्हाट्सअॅप संदेशाद्वारे नोंदविता येईल. याशिवाय शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या मेल आयडीवर सुद्धा करू शकतात. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. कृषीविषयक योजनांच्या  माहितीसाठी १८००२३३४००० हा कृषी विभागाचा हेल्पलाईन नंबर असून, शेतकऱ्यांनी आवश्यmकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी आयुक्ति सुनील चव्हांण यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या