🌟परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात नशामुक्त भारत अभियान कार्यक्रम संपन्न...!


🌟यावेळी जयश्री सोनकवडे प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण औरंगाबाद यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

पुर्णा : (दि.०१ जुलै २०२३) - सहायक आयुक्त, समाजकल्याण, परभणी व समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत विभागीय पातळीवरील कार्यक्रम दिनांक ३० जुन २०२३ रोजी श्रीमती जयश्री सोनकवडे, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परभणी येथील सभागृहात संपन्न झाला.


सदर कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणुन प्रा. रमेश शिंदे, श्री. शिवाजी महाविद्यालय परभणी हे उपस्थित होते. तसेच श्री पियुष केंद्रेकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती,परभणी,पुर्णा येथील सामाजिक कार्यकर्त्या  नंदिनी पानपट्टे व  अनिता आसेवार,गीता गुठ्ठे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, परभणी, श्री शिवानंद मिनगीरे, समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद, परभणी, अमित घवले, समाजकल्याण अधिकारी गट-ब यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजर्षि छत्रपति शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व दिप प्रज्वलन करुन शाहीर  काशीनाथ उबाळे यांच्या पथकाने सादर केलेल्या महाराष्ट्र राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या स्वागत प्रसंगी शाहीर श्री.काशीनाथ उबाळे यांच्या पथकाने स्वागत गीतानंतर व्यसनमुक्तीपर गीत व महिला सबलीकरण गीत सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्रीमती गीता गुठ्ठे, सहायक आयुक्त, समाजकल्याण,परभणी यांनी असे सांगीतले की, सामाजिक न्याय विभागा मार्फत दिनांक १२ जुन २०२३ ते २६ जुन २०२३ या कालावधीत नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत व्यसनमुक्त पधंरवडा साजरा करण्यात आला असून व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्यात आलेली आहे. तरुण पिढी तसेच विदयार्थ्यांनी व्यसनमुक्त होऊन चांगल्या गोष्टी अवगत कराव्यात असे प्रतिपादन केले.

प्रमुख व्याख्याते प्रा. रमेश शिंदे, श्री. शिवाजी महाविद्यालय परभणी यांनी त्यांच्या मनोगतात समाजकल्याण विभागा मार्फत नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत व्यसनमुक्तीसाठी मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला असल्याचे सांगीतले. तरुणाईने व्यसनापासून परावृत्त व्हावे. व्यसन करणा-या व्यक्तिंची व्यसनामुळे प्रतिकारशक्ती कमी होते तसेच असे व्यक्ती विविध आजारांना बळी पडतात व त्यांचे परिणाम त्यांच्या कुटुंबातील महिला व लहान मुलांना सहन करावे लागतात. त्यामुळे शासनाच्या व्यसनमुक्तीच्या कायदयाला लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहीजे असे मत व्यक्त केले पुर्णा येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती  नंदिनी पानपट्टे यांनी सर्वानी बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती मोठया प्रमाणात करावी तसेच व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करावेत असे सांगीतले.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक तथा अध्यक्षा श्रीमती जयश्री सोनकवडे,प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण औरंगाबाद यांनी मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात विदयार्थ्यांनी व्यसनाकडे वळु नये व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त होते. व्यसन करणारा व्यक्ती हा आभासी जगात जगतो व अशा व्यक्तींच्या कुटुंबातील महिलांचे शोषण होते. त्यांच्या जिवनातील आनंद हिरावुन घेतल्या जातो. व्यसन करणा-या व्यक्तींची विचार करण्याची क्षमता संपुष्टात येते त्यामुळे तरुन पिढीने विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या अधिन जाऊनका असा सल्ला दिला. या प्रसंगी व्यसनमुक्तीसाठी शपथ घेण्यात आली सदर कार्यक्रमात ऊसतोड कामगारांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटपाच्या आदेशाच्या प्रती संबंधीत लाभार्थ्यास मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आल्या.

याप्रसंगी वडगाव सुक्रे ता.जि.परभणी येथील 59 ऊसतोड कामगारांना प्राधान्याने ओळखपत्र वाटप करणाऱ्या ग्रामसेविका जी.बी.काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच शाहीर काशीनाथ उबाळे यांच्या पथकाचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी  शिवानंद मिनगीरे, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,परभणी यांनी आभार प्रदर्शन केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश पेडगावकर, कर्णबधीर विद्यालय, परभणी यांनी केले. 

सदर कार्यक्रमास जिल्हयातील ऊसतोड कामगार, व्यसनमुक्ती कार्यक्रमांतर्गत कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते व सहायक आयुक्त, समाजकल्याण परभणी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, परभणी या कार्यालयातील अजय साखेरे तुषार दवणे व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या