🌟हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात....!


🌟अपघात घडला ज्यामध्ये बसचा ड्रायव्हर गंभीरित्या जखमी झाला🌟

हिंगोली - शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील नॅशनल धाब्याजवळ आज सायंकाळी साडेचार च्या सुमारास फुलावर एसटी बस व गॅस सिलेंडर घेऊन जात असलेल्या ट्रक मध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला ज्यामध्ये बस चालकासह अनेक प्रवाशांना मार लागला तर अनेक प्रवासी जखमी झाल्याचे समजते बस चालकासह चार जणांना गंभीर मार लागल्यामुळे औंढा येथील दवाखान्यात पाठविण्यात आले होते पण त्यानंतर त्यांना हिंगोली येथे उपचारासाठी पाठवण्यात आले ट्रक ड्रायव्हर जागेवरून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात आले तर सदर बस औरंगाबाद डेपोची असून बस क्रमांक एम एच 20 बी एल 39 76  येथून वसमत कडे रवाना होत असताना गॅस घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच  26बीए 66 71 याने बसला जोरदार धडक देऊन अपघात घडला ज्यामध्ये बसचा ड्रायव्हर गंभीरित्या जखमी  झाला तर त्याच्यासोबत अन्य चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे सदर अपघात होताच औंढा नागनाथ येथील पोलीस स्टेशनचे पोलीस पथक व हट्ट येथील पोलीस पथक दाखल झाले तर सदर जखमींना काढण्यासाठी व  रस्ता करण्यासाठी वगरवाडी येथील बबन कदम बंडू कदम व अन्य लोकांनी मदत केली एक तासाच्या परिश्रमानंतर रस्ता खुला करण्यात आला यावेळी  यांनी पोलीस स्टेशनचे हट्टा गजानन बोराटे सतीश तावडे साहेब कोकरे साहेब कॉन्स्टेबल मारुती गडगिळे शेख इकबाल यांनी मोलाची भूमिका बजावली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या