🌟पुर्णा पोलिस प्रशासनाने पकडला गव्हांच्या चारशें पोत्यांनी भरलेला आयशर ट्रक : गव्हांचा साठा शासकीय की खाजगी ?


🌟नुतन पो.नि.प्रदिप काकडेंची पहिली धाडसी कारवाई : गुन्हा दाखल नाही,महसुल प्रशासनाच्या तपासणी अहवालाची प्रतिक्षा🌟


पुर्णा (दि.०९ जुलै २०२३) - पुर्णा शहरातील झिरो टी पॉईंट परिसरातून परभणी येथून नांदेडकडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक एम.एच ४३ वाय २५८९ हा 'ओंकार ट्रांन्सपोर्ट' नाव असलेला ट्रक ज्यात ४०० पोते गव्हाचा साठा असून हा ट्रक पूर्णा पोलिस प्रशासनाच्या पथकाने शनिवार दि.०७ जुलै २०२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली दरम्यान पोलिस स्थानकाचे नुतन पोलिस निरिक्षक प्रदिप काकडे यांनी पुर्णा पोलिस स्थानकाचा पदभार स्विकारताच ही पहिली धाडसी कारवाई असल्यामुळे या कारवाई पुर्णा तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्याचे लक्ष लागले असून सदरील ट्रक ताब्यात घेते वेळी ट्रक चालकाने ट्रक मध्ये कशाचा साठा आहे असे पोलिसांनी विचारले असता सोयाबीन साठा असल्याचे सांगितले परंतु पोलिसांनी प्रत्यक्ष पाहनी केली असता त्यात गव्हाचा साठा आढळून आल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिस पथकाने असा निष्कर्ष काढला की हा साठा शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतला असावा त्यामुळे पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पुर्णा पोलिस स्थानकात लावला आहे. 


पुर्णा पोलिसांनी जप्त केलेला चारशें पोती गव्हाचा साठा शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतील आहे की खाजगी ? या प्रश्नाचे उत्तर तर महसुल प्रशासनाकडेच असून महसूल प्रशासन या प्रश्नाचे खरे उत्तर देईल की संबंधित स्वस्त धान्य तस्करांच्या बाजूने कौल देईल ? या प्रश्नाचे उत्तर अजून गुलदस्त्यातच आहे पूर्णा पोलिसांनी ट्रक चालक रामराव मुरलीधरराव कारले राहणार दस्तापुर तालुका पुर्णा यास ताब्यात घेतले आहे.या कारवाई संदर्भात पोलिस प्रशासनाने महसूल प्रशासनास कल्पना दिली असल्याचे समजते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या