🌟कोट्यावधींच्या शेकडों विद्युत पोलवरील लाईट अद्यापही बेपत्ता मुख्याधिकारी पौळ यांचे उत्तर मात्र गोलमोल🌟
पुर्णा (दि.०४ जुलै २०२३) :- पुर्णेत विकासाचा वाजला फुटका ढोल अन् नगर परिषद प्रशासनाने शहरात उभारले सर्वत्र कोट्यावधी रुपयांचे नुसतेच विद्युत पोल ? कोट्यावधीच्या विद्युत पोलवरील लाईट अद्यापही बेपत्ता मुख्याधिकारी पौळ यांचे उत्तर मात्र गोलमोल अशी एकंदर अवस्था शहरात सर्वत्र झाल्याचे पाहावयास मिळत असून ज्या एका विद्युत पोलांची किंमत अवघी २० ते २५ हजार रुपये असेल अश्या शेकडो विद्युत पोलांची किंमत अंदाजपत्रकात तब्बल चार ते पाच पट दाखवून नगर परिषद प्रशासनाने "अंधेर नगरी चौपट राज...हुशार भ्रष्ट अधिकारी चतूर ठेकेदार बेवकूफ वोटरों की हजार पाचसोंपर दारोमदार" अशी एकंदर परिस्थिती शहरात झाल्याचे दिसत असून शहरासह शहराबाहेर ही शेकडो विद्युत खांब मोठ्या रुबाबात उभे असल्याचे दिसत असले तरी रात्रीच्या अंधारात मात्र जमिनीवर ओझे झाल्यागत दिसत आहेत.
पुर्णा शहरातील मस्तानपुरा,नवी आबादी,जुना मोंढा,बसस्थानक रोड,देणे समाजाचे रोड,अली नगर,शिक्षक कॉलनी,डॉ.आंबेडकर नगर ते पुर्णा-नांदेड रोड,सोनार गल्ली,नवा मोंढा परिसर आदी परिसरांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून उभारण्यात आलेल्या विद्युत पोलांवर ना अंडग्राऊंड विद्युत केबल जोडण्यात आलेले आहेत नाही त्या पोलांवर लाईट बसवण्यात आलेली आहे त्यामुळे पुर्णा नगर परिषदेने शहरात 'अंधेर नगरी चौपट राज' कारभाराला सुरुवात करीत कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी चोरट्यांच्या घशात घालण्याची यंत्रणा युध्दपातळीवर राबवण्यास सुरुवात केली की काय ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
शहरातील नवीन विद्युत पोलांवर लाईटच बसवण्यात आलेले नसल्यामुळे या पोलांवर धार्मिक तसेच विविध पक्षांचे ध्वज मात्र फडकतांना दिसत आहे त्यामुळे या विद्युत पोलवर तात्काळ लाईट बसवण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत असून शहरातील प्रभाग क्रंमांक ०१ मधील मस्तानपुरा,नवी आबादी,जुना मोंढा,परिसरातील नागरिकांना अक्षरशः अंधारात मार्गक्रमण करीत आपली घर गाठावी लागत आहेत तर याही पेक्ष दयनिय अवस्था दर सोमवारच्या आठवडी बाजारासह रोजचा भाजीपाला फळांचा बाजार भरणाऱ्या जुना मोंढा परिसरातील विद्युत पोलवरील लाईट बंद अवस्थेत असल्यामुळे या परिसरात मोकाट जनावरांच्या धुमाकुळासह मोबाईल चोर पाकीटमार दागदागीने पळवणाऱ्या टोळ्या सहज हात साफ करुन निघून जातांना दिसत आहेत.
शहरातील मस्तानपुरा नवी आबादी परिसरात तब्बल जवळपास सत्तर ते ऐंशी विद्युत पोल बसवून लाखो रुपयांचा शासकीय विकासनिधी गिळकृत करण्यात आला खरा परंतु या विद्युत पोलांवर लाईटसह अंडरग्राऊंड विद्यूत प्रवाह वाहिन्या अर्थात केबल मात्र अद्यापही बसवल्याचे आढळून आले नाही सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने या भागांतील नागरिकांना रात्रीच्या वेळी येतांना जातांना अंधारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे व पावसाळ्यामुळे साप विंचू निघत असल्यामूळे अशा विषारी जनावरापासून नागरिकांना मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी मस्तानपुरा नवी आबादीसह जुना मोंढा परिसरातील विद्युत खांबांवर देखील तात्काळ लाईट बसवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे......
0 टिप्पण्या