🌟छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात करण्यात आली निदर्शन🌟
परभणी (दि.२० जुलै २०२३) : मनिपूर राज्या मधील महिलांवरील अत्याचार आणि वाढत्या हत्येच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काल गुरुवार दि.२० जुलै २०२३ रोजी परभणीत जोरदार निदर्शने केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात या पक्षाचे जिल्हा सहसचिव अॅड. सुरेश चौधरी, मंचकराव बचाटे, अर्जूनराव साबळे, जय यादव, कृष्णा सामाले, राजू सोनपसारे, अनिल पानबुडे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या निदर्शनात सहभाग घेतला. भाजप सरकारने मणिपूर येथील परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणावी व महिलांवर अत्याचार करणार्यांविरोधात ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली....
0 टिप्पण्या