🌟परभणी जिल्ह्याच्या मावळत्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह नुतन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा सत्कार...!


🌟परभणीतील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते देवा पाटील मित्रमंडळाने केला सत्कार🌟


परभणी (दि.२५ जुलै २०२३) - परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पुर्व जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नागपूर येथे नुकतीच बदली झाली असून त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ ऐतिहासिक ठरल्यामुळे त्यांना निरोप देतांना अक्षरशः अनेकांची डोळे पानावली त्यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर आदींसह विविध पक्षांतील पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक तसेच शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले अश्या या जनहीताशी बांधिलकी जोपासत कर्तव्य बजावणाऱ्या मावळत्या सन्माननीय जिल्हाधिकारी आंचल गोयल व नव्याने जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारलेले सन्माननीय जिल्हाधिकारी श्री.रघुनाथ गावडे यांचा परभणीतील शिवसेनेचे जेष्ठ व धाडसी कार्यकर्ते देवा पाटील मित्र मंडळाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देवा पाटील व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने मावळत्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना त्यांच्यासह त्यांच्या चिमुकलीचा एकत्रित फोटो असलेली प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली तर नुतन जिल्हाधिकारी श्री.रघुनाथ गावडे यांचा देखील जिल्हाधिकारी कार्यालयात शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी देवा पाटील यांच्यासह ॲड.पवन निकम,नागेश हिवरे प्रेम पोरवाल आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी व मित्र मंडळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या