🌟पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान हे बोट उलटून थोडक्यात बचावले...!


🌟सतलज नदीच्या धरणात झालेल्या भगदाडाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत बोटीने रवाना झाले होते🌟

जालंधर : पंजाब राज्यातील जालंधर जिल्ह्यातल्या शाहकोट जवळील सतलज नदीच्या धरणात झालेल्या भगदाडाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान बोटीने जात असतांना बोट उलटल्याची भयंकर घटना घडली या घटनेत मुख्यमंत्री मान थोडक्यात बचावले यावेळी मोटार बोटीमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त लोक बसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे बोट पाण्यात काही अंतर गेल्यावर काळा धूर निघू लागला होता.  

मग बोट डळमळू लागली. नदीच्या जोरदार प्रवाहात बोट बुडण्यापासून सुदैवाने बचावली आणि भगवंत मान पडून थोडक्यात बचावले हा सर्व प्रकार होत असतांना प्रशासकीय अधिकारी दुरुन पाहत होते यावेळी त्यांचा देखील थरकाप उडाला.मोटार बोटीच्या चालकाला मोठ्या कष्टाने त्याला दुसऱ्या बाजूला नेण्यात यश आले. तेव्हाच बोटीतील नेते आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला शेवटी, मुख्यमंत्र्यांसह अनेकांना बोटीत बसण्यापासून का थांबवले नाही ?  याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या