🌟पालम येथे पार पडलेल्या निरोप समारंभावेळी पो.नि.काकडे यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला🌟
परभणी/पालम (दि.१० जुलै २०२३) - परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असतांना सर्वसामान्य माणसाला आधार देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने कायदा व सुव्यवस्था राखून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका पार पाडणारे वंचित पीडित अत्याचार ग्रस्त अन्यायग्रस्त यांना कायद्याच्या चौकटीत राहून न्याय देण्याची भूमिका पार पाडणारे शिस्तप्रिय म्हणून आगळे वेगळी ओळख निर्माण करणारे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांची नुकतीच पूर्णा तालुक्यात पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाल्याने पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे हे पालम तालुक्यात असताना अनेक मोठमोठे गुन्हे उघडीस आणले होते पालम तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांचे खूप मोठे योगदान आहे त्यांची बदली झाल्याने पत्रकार सुरक्षा समितीचे परभणी जिल्हा सरचिटणीस प्रसाद पौळ यांच्या हस्ते पुष्पहार घालून व मिठाई भरवून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार चांद तांबोळी उपस्थित होते...
0 टिप्पण्या