🌟परभणीत विधी व सेवा व प्राधिकरण येथे कायदेविषयक कार्यशाळा संपन्न...!


🌟या कार्यक्रमास प्रमुख अतिथी जिल्हा कारागृह अधीक्षक जी.के.राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟

परभणी (दि.२४ जुलै २०२३) : राज्य विधी व सेवा प्राधिकरणाच्या सर्वसाधारण कार्यक्रम पत्रिका २०२३ अन्वये जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण आणि सेतू सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच कायदेविषयक कार्यशाळा पार पडली.  

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.जी. लांडगे यांनी देह-व्यापाराविषयी उपस्थितांना माहिती दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने बुद्धदेव करमसकर विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार या प्रकरणात नमूद केल्याप्रमाणे कायदेविषयक माहिती दिली. त्यानंतर रफिक शेख यांनी उपस्थितांना  मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. मीनाक्षी राऊत, डॉ. प्रतिभा पाटील व ॲड. अनुराधा गायकवाड यांच्यासह सेवाभावी संस्थेच्या कर्मचारी, महिला व स्वयंसेवकांची उपस्थिती होती.   

विधी व सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते. प्राधिकरणाचे सचिव एस. जी. लांडगे यांनी विधी सहायविषयक माहिती दिली. यावेळी ॲड. अमोल गिराम यांनी भारतीय राज्यघटनेत नमूद कलमांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी जिल्हा कारागृह अधीक्षक जी. के. राठोड, सहायक विधी सेवा अभिरक्षक अधिवक्ता श्रीमती लायबा मिर्झा हाशम बेग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्ही. आर. सुयवंशी यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा कारागृह येथील अधिकारी –कर्मचारी व न्यायालयीन बंदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या