🌟या वेळी कृषि सहाय्यक श्री.रामेश्वर राऊत तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.सोनटक्के यांचे सहकार्य लाभले🌟
गंगाखेड (दि.05 जुलै 2023) - गंगाखेड तालुक्यातील मौ.आरबुजवाडी येथे आज बुधवार दि.05 जुलै 2023 रोजी मा. प्रकल्प संचालक आत्मा परभणी दौलतराव चव्हाण व प्रकल्प उपसंचालक तथा तालुका कृषी अधिकारी, गंगाखेड श्री. बनसावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा अंतर्गत सोयाबीन 'उत्पादन तंत्रज्ञान' या शेतकरी शेतीशाळेच्या दुसऱ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. प्रकाश साळुंके यांनी सोयाबीन बियाणे पेरणी करतेवेळी बीज प्रक्रिया करण्यासाठी दोन बुरशीनाशक व एक कीटकनाशक असलेले असलेले वार्डन, कॅसकीड, इलेक्ट्रॉन याचा वापर केल्याने शंखी गोगलगाय, मुळकुज, खोडमाशी इत्यादीचा प्रादुर्भाव होत नाही या विषयीवर मार्गदर्शन केले.
यावेळी बुरशीनाशक, किटकनाशक व जैविक जिवाणू संघ याची बीज प्रक्रिया प्रत्यक्ष कशी करावी याविषयीचे प्रात्यक्षिक करून दाखविले व शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी टोकण पद्धतीने करते वेळेस सोयाबीन टोकन यंत्रची जोडणी कशी करावी याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. बी. बी. एफ. तंत्रज्ञानाचा वापर व त्यासोबत तणनाशकाची फवारणी याचं शेतावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी कृषि सहाय्यक श्री. रामेश्वर राऊत तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. सोनटक्के यांचे सहकार्य लाभले. या शेतीशाळा वर्गास जय श्री हनुमान शेतकरी उत्पादक कंपनीचे सोयाबीन पीक प्रात्यक्षिके राबविणारे सभासद शेतकरी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या