🌟पुर्णा नगर पालिकेत भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांची वज्रमुठ ? म्हणतात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आम्हाला खुली सुट...?


🌟शासकीय विकासनिधींसह वसुली विभागातही घोटाळ्यांची मालिका : लेखा लिपिकाचा गैरकारभारावर चौकशी पुर्वीच गुलदस्त्यात ?🌟

🌟लिपिक कैलास माकुलवार यांच्या गैरकारभाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ ? जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी🌟

 पुर्णा (दि.१४ जुलै २०२३) - 'जगात जर्मनी भारतात परभणी अन् परभणीत पुर्णा अन् भ्रष्टाचारी बकासुरांना गिळायला येथे कोट्यावधींची विकासनिधीही पुरणा' असा एकंदर कारभार पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा झाल्यामुळे अक्षरशः गेंड्याच्या कातडीचा मजबूत बुरखा पांघरलेले भ्रष्ट गुत्तेदार,तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि भ्रष्टाचाराची मालिका अत्यंत यशस्वीपणे चालवणारे अधिकारी कर्मचारी यांची मजबूत वज्रमुठ शासकीय संपत्तीसह शासकीय विकासनिधीची लुट अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने चालवत असल्याचे सर्वसामान्या जनतेला ठळकपणे दिसत असतांना प्रशासकीय कुंभकर्णांचे मात्र याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष होत आहे असंख्य तक्रारी,असंख्य माहिती अधिकार,अनेकवेळा आंदोलन उपोषण करुन देखील 'कुठल्याही तक्रारींचे ना..निवारण...ना चौकशी ? असंख्य तक्रार अर्जांची कुंभकर्णी झोपेतल्या अधिकाऱ्यांच्या डोक्याली जणू उशी' अशी परिस्थिती झाल्यामुळे नगर परिषदेत भ्रष्ट कारभारासह घोटाळ्यांची मालिका चालवणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कमालीचे वाढल्याचे दिसत आहे. 


पुर्णा नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी युवराज पौळ अश्या गैरकारभारासह भ्रष्टाचारात बरबटलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्सह निकृष्ट व बोगस विकासकाम करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या तक्रारदारांनाच धमकावत मला मागच्या काळात काय झाले ते सांगत जावू नका मी मुख्याधिकारी आहे दंडाधिकारी नाही असे म्हणत भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा गंभीर प्रकार करीत असल्याचे दिसत आहे ? नगर परिषदेतील लेखा विभागात कार्यरत लिपिक कैलास माकुलवार याची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शेख अक्रम यांनी जिल्हाधिकारी यांना दिले . अनेक नागरिकांनी न प च्या बोगस कामांची तक्रार करून सुध्दा स्थानीक मुख्याधिकारी पौळ हे बेजबाबदार उत्तरे देऊन उलट माहिती मागणाऱ्या तक्रारदारांसोबत अरेरावीची भाषा वापरात असुन बोगस कामांना अभय देत तर नाहीत ना ?

        पूर्णा नगरपरिषद मधील लेखा विभागात लिपिक पदावर कार्यरत कैलास माकुलवर हे मागील सात ते आठ वर्षांपासून नगर परिषदेत ठाण मांडून बसलेले आहेत स्थानिक पुढाऱ्यांची व गुत्तेदारांची मर्जी सांभाळण्यात माहीर असल्याने त्यांचे अनेक काळे कारभार झाकले गेलेत त्यांच्या हुकुमा शिवाय लेखाधिकारी हे कुठल्याही चेकला गांधी दर्शना आधी हात सुध्दा लावत नसल्याने एक प्रकारे त्यांची लेखा विभागात हुकूमशाहीत चालत असल्याचे दिसत आहे पुर्णा नगर परिषदेतील बोगस नौकरभरती प्रकरण संपूर्ण जिल्ह्यात गाजले या बोगस नौकरभरती प्रकरणा मध्ये लेखा लिपिक पदावर असलेल्या माकूलवार यांचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले होते कारण त्यांनीच बोगस कर्मचाऱ्यांची नावे मासिक वेतन यादीत समाविष्ट केली होती तत्कालीन मुख्याधिकारी अजय नरळे यांनी या मासिक वेतन यादीवरूनच बोगस नौकरभरतीचा भांडाफोड केला होता यानंतर वसुली विभागात देखील बोगस पावती बुकाच्या आधारे गाळेधारकांकडून लाखो रुपयांचा वसुली घोटाळा झाला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेतील आरोपीत कर्मचाऱ्याने लेखी जवाबात अनेकांचा सहभाग असल्याचे लिहून दिले होते यात देखील माकूलवार यांचे नाव होते.  

      पुर्णेतील सामाजिक कार्यकर्ते शेख अक्रम यांनी स्थानिक नगर परिषदेत तक्रार केली होती परंतु स्थानिक मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी थातुरमातुर उत्तरे देत त्यांना लेखी स्वरूपात जबाब दिला खरा परंतु सदरील उत्तरे ही बिनबुडाचे व संबंधित कर्मचाऱ्यांचे काळे कारनामे झाकून ठेवणारे असल्याने आता त्यांनी त्या पत्राचाच संदर्भ देत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे मुद्दे निहाय चौकशी करण्याची मागणी अर्जाद्वारे दि १० जुलै २०२३ रोजी केली पूर्णा नगर परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तक्रारी नागरिकांच्या आहेत बांधकाम विभाग व विद्युत विभागात तर कागदोपत्री कोट्यवधी रुपयांची बोगस बिले अदा करण्यात आली दोन तीन महिन्यांपूर्वी बनवण्यात आलेले अत्यल्प कालावधीत भुकंपात तडा गेल्या प्रमाणे तडा जावून रस्ते खराब झाले तर शहरात घाणीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणात पसरले आहे 

         कोणती माहिती किंवा तक्रार घेऊन घेल्यास नुतन मुख्याधिकारी पौळ हे आमच्याकडे काय तेच काम आहे काय ? साध्या अर्जावर माहिती देता येत नाही  कोणत्या नियमात आहे ते दाखवा , तुमच्याकडे जी आर आहे का ,  शहरात शेकडो नवीन विद्युत खांब उभे केलेले आहेत त्यांची केबल व लाइट लावलेले नसल्याने शोभेचे बाहुले उभे राहिले या सर्व बोगस कामांबाबत सांगितले असता आम्हाला वेळ मिळाल्यावर बघूत असे बेजबाबदार उत्तरे देत एक प्रकारे भ्रष्टाचाऱ्यांचे पाठीराखे बनत नागरिकांना उद्धट उत्तरे देत आहेत पूर्णा नगरपालिकाच्या प्रशासक काळातील कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या