🌟मयत दोन ही युवक सेलू शहरातील गायत्री नगरातील रहिवासी🌟
परभणी/सेलू (दि.०८ जुलै २०२३) : परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या गेट जवळ दुधना पात्रात पोहतांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवार दि.०८ जुलै २०२३ रोजी दुपारी ०४-०० वाजेच्या सुमारास घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेत मृत्यू पावलेले दोनही युवक सेलू शहरातील गायत्री नगर येथील असून यातील एकाचे नाव रोहीत दिपक टाक वय २३ वर्षे तर दुसऱ्याचे नांव नितीन गुनाजी साळवे वय असे आहेत सदरील युवक निम्न दुधना प्रकल्पाच्या गेट जवळ दुधना नदी पात्रात पोहत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार मच्छिमारी करणाऱ्या भोई यांनी बघितल्यामुळे पुढे आला. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोउपनी कमलाकर अंभोरे हे काही कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मच्छीमार भाई बांधवांच्या मदतीने हे दोन्ही मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले.....
0 टिप्पण्या