🌟शेगाव येथील रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रंजन तेलंग एक महिन्याच्या गॅप नंतर पुन्हा धाडसी कारवायांसाठी सक्रीय...!


🌟रंजन तेलंग यांनी रिकार्ड वरील दोन संशयित गुन्हेगार घेतले ताब्यात🌟 

शेगाव (दि.०९ जुलै २०२३) - श्रीक्षेत्र शेगाव येथील रेल्वे सुरक्षा बल प्रशासनात कार्यरत असलेले प्रधान आरक्षक रंजन तेलंग हे सतत आपल्या धडाडीच्या कार्यवाही ने कायम चर्चेत असतात.महिना भरात दुसऱ्या ठिकाणी ड्युटी ला गेलेल्या तेलंग यांनी शेगाव येथे ड्युटी वर येताच यात्रेकरू च्या सामानाची चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना आज रात्री दोन च्या सुमारास ताब्यात घेतले व चौकशी केली असता दोघेही रिकार्ड वरील आरोपी असल्याचे समजले तसेच चोरीच्या उद्देशाने रेल्वे स्टेशन परिसरात आल्याचे समजले त्यावरून ही कार्यवाही करण्यात आली असून(1)विक्रम कृपाप्रसाद नादनाने वय वर्ष २२ राहणार वाके रायपुर तालुका भातकुली,जिल्हा अमरावती व शाम सुधाकर सोनवणे शेख वय वर्ष ४४ राहणार आर्वीनाका वर्धा या दोघांना ताब्यात देण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या