🌟नांदेड येथे रेल्वे अपघातात ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू....!


🌟मयत इसमाची ओळख असल्यास पो.ना.निकाळजे यांचे मोबाईल क्र.7499700674 या क्रमांकावर कॉल करून कळवावे🌟

नांदेड (दि.०७ जुलै २०२३) - नांदेड येथे रेल्वे अपघातात अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा आज शुक्रवार दि.०७ जुलै २०२३ रोजी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

  या घटने संदर्भात नांदेड रेल्वे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यू क्र.५१/२०२३ चे कलम १७४ भादवी अन्वये गुन्हा दाखल असून नमूद  इसमाची अद्याप पावतो ओळख पटलेली नाही तरी त्याचे अंगात काळ्या भुरकट रंगाचे पट्याचे टी शर्ट असून काळ्या रंगाची नाइट पँन्ट घातलेली असून त्याचे उजव्या हातावर लव्ह चे चिन्ह व पिंपळाचे पान गोंधलेले आहे ..वरील नमूद इसमास कोणी ओळखत असेल तर त्यांनी रेल्वे पोलीस स्टेशन नांदेड येथील पोलीस नाईक  निकाळजे यांचे मोबाईल क्रमांक 7499700674 या क्रमांकावर कॉल करून कळवावे असे आवाहन रेल्वे पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या