🌟परभणीत शिवसेना (उबाटा) पक्षाच्या संतप्त महिला पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी भाजपा नेते सोमय्यांचा केला जोरदार निषेध...!


🌟शिवसेनेच्या विधानसभा संघटक सौ.अंबीका अनिल डहाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले निदर्शन 🌟

परभणी (दि.18 जुलै २०२३) : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या जाहीर वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या संतप्त महिला पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मंगळवार दि.18 जुलै 2023 रोजी दुपारी छत्रपती शिवाजी चौकात जोरदार निषेध आंदोलन केले.

           शिवसेनेच्या विधानसभा संघटक सौ. अंबीका अनिल डहाळे यांच्या नेतृत्वाखाली या चौकात केलेल्या आंदोलनात सोमय्या यांच्या प्रतिमेस संतप्त पदाधिकार्‍यांनी जोडे मारले. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सखूबाई लटपटे, कमल कसाले, वंदना कदम, कविता नांदुरे, द्रोपदी जावळे, प्रयागबाई आहेर, निर्मला भावसार, किर्ती चौधरी, वैशाली भांडे, द्रोपदी बागल, मीना खानापूरे, मनिषा काळे, अस्मिता जाधव, प्रणिता गाजरे, जयश्री अडणे, सविता मठपती, सरस्वती शिंदे, ललिता गायकवाड, लीना फुटाणे, सुनीता सोनवणे, जयश्री कुलकर्णी आदी सहभागी होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या