🌟अधिक माहितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डी.एच.लोंढे यांनी केले🌟
परभणी (दि.२६ जुलै २०२३) : गंगाखेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रंगकाम, किरकोळ इमारत दुरुस्ती व नविन शेड, डोम तयार करायचे आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणी असलेल्या वास्तुविशारदांकडून गंगाखेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून सीलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यांच्या या सिलबंद निविदा आवश्यक त्या कागदपत्रासह गंगाखेड येथील आयटीआय संस्थेस दि.३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर कराव्यात. निविदेच्या अटी शर्ती व इतर सविस्तर माहितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डी. एच. लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.....
0 टिप्पण्या