🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्त्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟देहव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी समिती गठित करून प्रस्ताव सादर करावा - मंत्री मंगल प्रभात लोढा✍️ मोहन चौकेकर

* सत्ताधाऱ्यांसाठी अत्यंत जटील प्रश्न बनलेला खाते वाटपाचा तिढा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीत सुटला;अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच म्हणजे अजितदादा पवार यांच्या कडेच राहणार ; अजितदादा पवार यांच्या बहुतांश मागण्या मान्य. 

* अन्न व औषध प्रशासन विभागाचा तक्रार क्रमांक तीन अंकी होणार,नागरिकांकडून सूचना आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा निर्णय.

* अजित पवारांना मुख्यमंत्री पद द्यावे व एकनाथ शिंदे यांना अर्थ मंत्रीपद देऊन सरकारने अर्थ मंत्रिपदावरून निर्माण झालेला तिढा सोडवावा असा खोचक टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सरकारला लगावला.

* भीमाशंकरला दर्शनासाठी जाणारी एसटी बस आंबेगाव तालुक्यातील गिरवलीतील ओढ्यावरुन खाली कोसळली; बसमधील 35 प्रवाशांपैकी 05 प्रवासी जख्मी 

* राजकारण: BJP च्या विधानसभेत 152 जागा निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा; मग अजित पवार अन् शिंदे गटाला किती जागा ?

* एलॉन मस्क करणार धमाका: ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रात ठेवणार, स्वत:ची एक्सएआय (xAI) आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी लाँच.

* देहव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी समिती गठित करून प्रस्ताव सादर करावा,महिला व बालविकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश 

* मेळघाटमध्ये एका  महिलेने दिला चक्क चार मुलांना जन्म ; महिला व चारही मुली सुखरुप 

* राजु शेट्टी, रविकांत तुपकर सदाभाऊ खोत व रघुनाथ पाटील या शेतकरी नेत्यांना वगळुन राज्य सरकारने केली ऊस दर नियंत्रण समिती स्थापन. 

* नवाब मलिकांना दिलासा नाहीच ; मुंबई हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला.

* संरक्षण दलाची ताकद वाढणार 3 स्कॉर्पिअन पाणबुड्या, 22 राफेल अन् 4 ट्रेनर विमानं मिळणार.

* धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर, 'धनगड' हेच 'धनगर' असल्याच्या मुद्यावर पुरावे सादर करा; हायकोर्टाचे निर्देश.

* सीमा पाकिस्तानला न परतल्यास 26/11 सारखा हल्ला करू, मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल.

* आदिपुरुषचे बजेट 700 कोटींचे तर चांद्रयानचा खर्च 615 कोटींचा.

* पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पॅरिसमध्ये जल्लोषात स्वागत, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेणार भेट.

* साखर कारखानदारांच्या फायद्यासाठी समितीतून वगळले; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची सरकारवर टीका.

* शेअर बाजारात तेजी तरीही गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान.

* अखेरच्या टी 20 सामन्यात  बांगलादेशनं भारतीय महिलांना हरवले, हरमनप्रीतच्या संघाची मालिकेत  2-1 ने बाजी.

* उद्या आंध्र प्रदेशातून "चांद्रयान 3" घेणार अवकाशात झेप

* मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेल -- मनसे प्रमुख राज ठाकरे  

*कृष्णा-भीमा नदी जोड प्रकल्प कामाचे सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यास मान्यता :-

कृष्णा खोऱ्यातील सातारा, सांगली कोल्हापुर या जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी व पुराचे वाहुन जाणारे पाणी हे सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आज मुंबई येथे बैठक घेतली. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंभाळकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

* कृष्णा-भीमा नदी जोड प्रकल्प कामाचे सर्वेक्षण करण्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास बैठकीत मान्यता दिली.या प्रकल्पामुळे 1.25 लाख हेक्टर जमिनीला शेतीसाठी पाणी मिळेल.पिण्याच्या पाण्याची सोय होईल. तसेच पूरनियंत्रण करता येईल. ₹15000 कोटी किमतीच्या या प्रकल्पाकरीता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून (ADB) अर्थसहाय्य घेण्याचा निर्णय केला.

* निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. 

* मंत्री अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एकच जमीन जी 2014 रोजी खरेदी केली, त्याच्या किमतीमध्ये 2019 ला अधिकची किंमत दाखवण्यात आली आहे

अशाच एकूण 4 ते 5 मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावत असल्याचं न्यायालयाच्या तपासात आढळून आलं आहे. त्यामुळे सिल्लोड न्यायालयानं याप्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. 

* मंत्रिमंडळाचा विस्तार कधी या प्रश्नावर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी वार व वेळच सांगुन टाकली*

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुलाम म्हणून काम करेल -- बच्चु कडु 

* सरकारमध्ये  लवकरच मोठे कांड होणार शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा.

* महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी काॅग्रेसची राज्यपालांकडे मागणी.

* मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून त्वरित करावी, या जमिनी नोडल एजन्सीला हस्तांतरित करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश 

* शेअर बाजार: आज सेन्सेक्स 164.99 अंकांनी वाढून तब्बल 65,558.89 अंकांवर बंद, तर निफ्टी 29.45 अंकांनी वाढत 19,413.75 अंकांवर बंद.

* एलॉन मस्क करणार धमाका: ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रात पाऊल ठेवणार, स्वत:ची एक्सएआय (xAI) आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी लाँच.

* व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये तुमचा नंबर आता राहणार सेफ,  Hide करण्याचा खास ऑप्शन लवकरच येणार, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये नंबर Hide करता येणार अर्थात लपवता येणार.

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 60,000 रुपये.

* सेन्सॉर बोर्डाने OMG 2 चे रिलीज तात्पुरते थांबवले: सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट रिव्ह्यू कमिटीकडे पाठवला, आदिपुरुष चित्रपटाचा वाद पाहता निर्णय.

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या