🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या......!


🌟ईडीची मोठी कारवाई, पुणे येथील 429 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अमर मूलचंदांनी याला अटक🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

* नवनिर्वाचित मंत्रीआदितीं तटकरे विरोधात 6 आमदार एकवटले,नवनिर्वाचित मंत्री आदिती तटकरेंविरोधात शिंदेसेनेने मोर्चा उघडला,वादाची ठिणगी पडली.

* सत्तेत येता राष्ट्रवादी, शिंदेसेनेत वादावादी ; 2 आमदार भिडले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौरा सोडून मुंबईत परतले.

* टिल्ल्या जा,देवगिरी बंगल्यावर सलाम ठोकून ये...विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची नीतेश राणेंवर टीका

* अजित पवारांसह 11 जणांची हकालपट्टी; राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव मंजूर, शरद पवारांचे सुप्रीम कोर्टात व निवडणूक आयोगात जाण्याचे संकेत 

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार दोन्ही बाजूने फसले; अजित पवार सत्तेत, बच्चू कडू भाजपवर संतापले.

* ईडीची मोठी कारवाई, पुणे येथील 429 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अमर मूलचंदांनी याला अटक.

* ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर करा; मंत्री अतुल सावे यांचे निर्देश.

* संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 19 जुलैला सर्वपक्षीयांची बैठक.

* आधी शिवसेना मग राष्ट्रवादी,उद्या महाराष्ट्रही फोडतील...उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका.

* वंदे भारतचा महागडा प्रवास होऊ शकतो स्वस्त, केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय भाडे कमी करण्याच्या  तयारीत.  

* बीएमसीची चौकशी करणार तर पीएम केअर फंडाचीही करा! उद्धव ठाकरेंची मागणी.

* पत्रकार परिषद रद्द करून राहुल गांधी घेतली शरद पवारांची भेट, जितेंद्र आव्हाडांनी केले स्वागत

* Sensex आणि Nifty 'ऑल टाईम हाय'वर, गुंतवणूकदारांनी कमावले ₹1.71 लाख कोटी

* जळगावात आभाळ फाटले, पहिल्याच पावसात 2 बळी,माजी नगरसेवक वाहून गेला.

* पेट्रोलपेक्षाही टॉमेटो महाग; इतर भाज्यांचे दरही कडाडले.

* शैक्षणिक संस्थांमधील जातीभेद गंभीर मुद्दा; यूजीसी कोणती पावले उचलणार? सुप्रीम कोर्टाने केली विचारणा.

* इस्रो नव्या मोहिमेसाठी सज्ज : रॉकेटसोबत जोडलं चांद्रयान-3, पुढील आठवड्यात होणार प्रक्षेपण.

* सहकार क्षेत्रातील मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बंद करण्याचे आदेश, RBI ने केला परवाना रद्द.

* मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुण्यातील बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या.

* पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता :-

भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचं सोशल मीडियावर दिसत होते त्यामुळे आता ह्या चर्चा जास्त जोर धरु लागल्या आहेत.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे.  पंकजा मुंडे यांनी दोन वेळा दिल्लीत जाऊन भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

* काँग्रेसचे नेते राहुल गांधी शरद पवारांना भेटले :-

महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या एकूणच राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली.

* राज-उद्धव एकत्र येणार ?

मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा आहे.मनसे नेते अभिजीत पानसे हे राज ठाकरे यांचा युतीचा प्रस्ताव घेऊन गेले. आणि खा. संजय राऊत यांच्याकडे हा प्रस्ताव दिला आहे.

* अजित पवार यांच्यासह ९ मंत्री आणि सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या सह 2 खासदार यांचे राष्ट्रवादीतून निलंबन :-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ९ मंत्री आणि सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस आर कोहली यांच्या सह 2 खासदारांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्यात आल्याची घोषणा शरद पवार व पीसी चाको यांनी केली आहे. दिल्लीतील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. 

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि एनडीएशी हातमिळवणी केलेल्या ९ आमदारांची हकालपट्टी करण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने मान्यता दिली.

* शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी ?

गरज नसतांना राष्ट्रवादीला सोबत का घेण्यात आले असा प्रश्न पडला असल्याचे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. तसेच माझ्यासह अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे देखील संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्हाला संधी कधी मिळणार? आम्ही देखील बंड केला होता, आम्ही फक्त पालख्या वाहत राहायचे का? असा प्रश्न नाराज आमदारांकडून बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

* पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील एकाच कुटुंबातील दोन भाऊ बनले पोलीस उपनिरीक्षक :-

* आदर्श गाव पिंपरी जलसेन येथील शाहीर हिरामण थोरात यांच्या दोन्ही मुलांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या परिक्षेत दर्शन याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. तर मोठा मुलगा दिगंबर याने दोन वर्षांपूर्वी या परिक्षेत यश मिळविले होते. एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ पोलीस उपनिरीक्षक झाल्याने परिसरातून त्यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

* माझ्या मागे मोदी-शाहांची शक्ती, सरकार पडणार या निव्वळ अफवा ; राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

* वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल 15 दिवसात निर्णय घ्या, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम

* जम्मू–काश्मीरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अवमान, 14 जणांची तुरुंगात रवानगी

* लग्न न झालेल्या पुरुषांना आणि महिलांना मिळणार 2750 रुपयांची मासिक पेन्शन, हरयाणा सरकारची मोठी घोषणा

* 'बाईपण भारी देवा' सिनेमातलं गाजत असलेलं 'मंगळागौर' गाणं अभिनेत्री आदिती द्रविडने लिहलं आहे; ते गाणं युट्यूबवर होतंय ट्रेंड

* 'मावळ लोकसभा मतदारसंघातून मीच निवडणूक लढवणार,'  खासदार श्रीरंग बारणे यांचा दावा

* बीएसईकडून शेअर बायबॅकची घोषणा; 816 रुपयांच्या दराने शेअर्स खरेदी करणार

* ‘MPSC’च्या सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ आणि तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा गट-ब या पदाच्या चाळणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर,

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या