🌟परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील फरकंड्यातील दिग्रस बंधाराग्रस्तांचा आर्थिक/मानसिक छळ शासन केव्हा थांबवणार ?


🌟दिग्रस बंधाऱ्यातील उर्वरित प्रकल्पग्रस्तांना तात्काळ मोबदला मिळावा म्हणून प्रसाद पौळ मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार🌟

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातल्या फरकंडा येथील दिग्रस बंधारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रशासकीय स्तरावर होणारा आर्थिक/मानसिक छळ शेवटी थांबणार तरी केव्हा ? असा संतत्प सवाल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत असून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येथील पत्रकार प्रसाद पौळ हे मागील अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देत आहेत अनेकवेळा त्यांनी निदर्शन आंदोलन उपोषण करून देखील जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्यामुळे प्रसाद पौळ हे लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यांच्याकडे उर्वरित प्रकल्पग्रस्तांना तात्काळ मोबदला वाटप करण्यासंदर्भात भेट घेऊन त्या संदर्भात पाठपूरावा करणार असल्याचे मत प्रसाद पौळ यांनी व्यक्त केले.

सविस्तर वृत्त असे की,पालम तालुक्यातील फरकंडा येथील उर्वरित प्रकल्पग्रस्तांना तात्काळ मोबदला वाटप करण्यासंदर्भामध्ये मागणी करणार असून नांदेड पाटबंधारे मंडळाकडून वारंवार मार्गदर्शनावर मार्गदर्शन मागणी होत असून शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा मोबदला असंच चालू राहिले तर कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वर्गामध्ये अजून या उर्वरित वंचित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला मिळावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे तसेच मुख्यमंत्री साहेब यांची आपण प्रत्येक्ष भेट घेऊन यासंदर्भात कायम तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असून लवकरच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळण्यासाठी प्रसाद पौळ पाठपूरावा करणार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून कायम तोडगा काढण्यासंदर्भामध्ये पाठपुरावा करणार असल्याचे मत आमच्या प्रतिनिधीशी बोलतांनी प्रसाद पौळ म्हणाले....





 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या