🌟पुर्णा-नांदेड व पुर्णा हिंगोली लोहमार्गा खालील रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न पुन्हा गंभीर...!


🌟रेल्वे भुयारी मार्गात पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात साचल्यामुळे वाहन धारकांचा या मार्गावरून प्रवास झाला धोकादायक🌟 


पुर्णा (दि.२५ जुलै २०२३) - पुर्णा-नांदेड राज्य मार्गावर हिंगोली गेट परिसरात मागील चार वर्षापासून रेल्वे उड्डाण पुलाचे काम चालू असल्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून पुर्णा-नांदेड व पुर्णा हिंगोली लोहमार्गा खालील रेल्वे भुयारी मार्गाचा वापर रहदारीसाठी होत असून हा रेल्वे भुयारी मार्ग मागील चार वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यात पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात साचत असल्याने या मार्गावरील वाहतूक वाहन धारकांसह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी देखील धोकादायक ठरत आहे.


या रेल्वे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात साचणारे पावसाचे पाणी सुरळीतपणे बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सातत्याने निष्क्रिय ठरत असल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात या मार्गाचा प्रश्न गंभीर होत असल्याचे निदर्शनास येत या रेल्वे भुयारी मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रशासन प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा खर्च केल्याचे दाखवून एखाद्या स्थानिक छोट्या मोठ्या बांधकाम मिस्त्रीकडून काम करून घेत असल्यामुळे या मार्गाचा प्रश्न सातत्याने 'जैसे थेच' राहत असून रेल्वे प्रशासन/सार्वजनिक बांधकाम विभाग/नगर परिषद प्रशासन या मार्गावर एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे असाच गंभीर प्रकार आज मंगळवार दि.२५ जुलै २०२३ रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुपारच्या सुमारास या रेल्वे भुयारी मार्गावर पाहावयास मिळाला पुर्णा-नांदेड मार्गासह ग्रामीण भागातून पुर्णेकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना या पर्यायी रेल्वे भुयारी मार्गातून मार्गक्रमण करतांना अक्षरशः कंबरे पर्यंत साचलेल्या पाण्यातून आपला जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागला ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाचे निष्क्रिय धोरण उजागर करणारीच म्हणावी लागेल....  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या