💥पाथरी तालुक्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन करणार मतदार पडताळणी....!


💥नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन💥 


पाथरी  (प्रतिनिधी) :- पाथरी विधानसभा मतदारसंघ 98 संदर्भात सर्व राजकीय पक्ष, सर्व पत्रकार बांधव, सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या बैठका पाथरी पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात दि.20 जुलै 2023 गुरुवार रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या,प्रत्येक तालुक्यात मतदार यादी परिपूर्ण व अचूक करण्यासाठी छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या अंतर्गत 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे घरोघरी जाऊन मतदार यादीनुसार मतदारांची पडताळणी करणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली आहे. तसेच बीएलओंच्या सहकार्याने मतदार यादीतील नाव तपासणे, नवमतदारांची नोंदणी, मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडणे, कुटूंबातील मृत व्यक्तींची नावे वगळणे, नाव पत्ता किंवा इतर तपशिलांमध्ये दूरुस्त्या करणे आणि स्थलांतर झाले असल्यास पत्ता बदलून घेणे ही कामे करण्यात येणार आहेत.

प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या बैठकीत अठरा वर्षे पूर्ण झालेले नवीन मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करावी तसेच आपल्या महाविद्यालयात सर्वाची नांव नोंदणी होईल याची दक्षता घेणे आदी सुचना देण्यात आल्या आहेत,जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नवमतदारांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले आहे.याबैठकीस पाथरी / मानवत तहसीलदार पल्लवी टेमकर,सोनपेठ तहसीलदार सुनील कावरखे,नायब तहसीलदार प्रकाश गायकवाड, उप विभागीय कार्यालयातील निवडणूक विभागाचे अव्वल कारकून नानासाहेब भेंडेकर, सोनपेठ निवडणूक विभागाचे महम्मद सलिम, ज्ञानेश्वर घाडगे, संपादक किरण स्वामी आदिंसह पाथरी विधानसभा मतदारसंघातून सर्व राजकीय पक्ष तालुका अध्यक्ष,सर्व पत्रकार बांधव व सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या