🌟पुर्णा शहरासह तालुक्यातील लोकांची डॉ.डि.आर.वाघमारे यांनी आरोग्य विषयक सेवा अखंडितपणे तब्बल साठ वर्षे केली...!


🌟जेष्ठ रिपांई नेते प्रकाश कांबळे यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा (दि.०२ जुन २०२३) : डॉ.दत्तात्रय वाघमारे आणि त्यांच्या परिवाराने पूर्णा शहरात दिलेल्या सामाजिक,शैक्षणिक आणि आरोग्य सेवेला तोड नसल्याची भावना रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचा सत्कार करतांना व्यक्त केल्या.या प्रसंगी परभणी जिल्ह्याचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा प्रमुख मा.विशाल कदम उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर दिनाचे औचित्य साधून पूर्णेच्या संविधान गौरव समितीच्या वतीने शहरातील मान्यवर डॉक्टर मंडळी चा प्रातिनिधिक स्वरूपात शाल, पुष्पहार व मिठाई भरवून डॉ.विनय वाघमारे,डॉ.गुलाब इंगोले,डॉ.संदीप जोंधळे,डॉ.गंगाधर कांबळे,डॉ.अकमार,डॉ.मंदुरले आदि मान्यवर डॉक्टर मंडळीचा सत्कार करण्यात आला.

  या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना कांबळे पुढे म्हणाले,डॉ.वाघमारे साहेबांनी पूर्णा शहराची आणि परिसरातील लोकांची आरोग्य विषयक सेवा अखंडितपणे सुमारे साठ वर्षे केली.हे करीत असतानाच शैक्षणिक संस्था निर्माण करून मुलांच्या शिक्षणाची सोय केली.आज पूर्णेचे विद्यार्थी मराठी आणि इंग्रजी भाषेत शिक्षण घेवून वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या हुद्द्याच्या जागा पटकावित आहेत.याचे सर्वस्वी श्रेय डॉ.दत्तात्रय वाघमारे साहेब यानाच आहे.आज डॉक्टर  साहेबानी नवद्दी गाठली आहे,तरी त्यांचा काम करण्याचा हुरूप कमी होत नाही.हे तरुणांना स्फूर्तीदायक आणि प्रेरणा देणारे आहे या प्रसंगी उपस्थितांनी डॉक्टरांच्या निरोगी दीर्घायुश्याबद्दल अभिष्टचिंतन केले.

या छोटेखानी सत्कार समारंभास डॉ.हरिभाऊ पाटील,भीमरावजी कदम,विजय बगाटे,गौतम काळे,जगदीश जोगदंड,शिवाजी वेडे,अनिल आहिरे,मोहन लोखंडे,प्रदीप ननवरे,अब्दुल रहीम,विजयकुमार जोंधळे,सिध्दार्थ भालेराव,शाहीर गौतम कांबळे,दिलीप गायकवाड,आदि मान्यवर उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या