🌟शेगाव रेल्वे सुरक्षा बलाची कर्तव्यतत्परता : अवघ्या तीन तासात नागपूर येथील व्यवसायिक प्रवास्याचा मोबाईल दिला परत....!


🌟रेल्वे सुरक्षा बलाचे रंजन तेलंग यांनी दिला समयसूचकतेसह कर्तव्यतत्परतेचा परिचय🌟

नागपूर (दि.०९ जुलै २०२३) - नागपूर येथील व्यावसायिक कमलेश जेठाणी पुणे ते शेगाव प्रवास करून आज रविवार दि.०९ जुलै २०२३ रोजी गरीबरथ एक्सप्रेस क्र.१२१११३ या प्रवासी रेल्वेने प्रवास करत शेगावला उतरले मात्र गडबडीत ते त्यांचा मोबाईल रेल्वे डब्यातच विसरून गेले त्याच वेळी त्यांना कर्तव्यावर कार्यरत असलेले प्रधान आरक्षक रंजन तेलंग रेल्वे स्टेशनवर दिसून आले त्यांनी लगेच ही बाब तेलंग यांना सांगितली तेलंग यांनी विभागाचे कॅट्रोल वरून स्टाफ ला याबद्दल माहिती देऊन अकोला येथे मोबाईल उतरविला एवढेच नाही तर दर्शनासाठी आले आहे त्यांना त्रास होऊ नये यासाठी मोबाईल दुसऱ्या ट्रेन वर बोलावून शेगाव येथेच जेठाणी यांना परत दिला यावेळी जेठाणी हे भावूक झाले आणि वर्दीतल्या सतर्कतेला मनापासून त्यांनी धन्यवाद दिला रंजन तेलंग यांच्या कार्याचा विभाग नेहमीच दखल घेत असते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या