🌟पुर्णेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 'एक सही संतापाची' अभियान......!


🌟पुर्णा शहरासह तालुक्यातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद🌟


महाराष्ट्रात चालू असलेल्या गढूळ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची हे अभियाची सुरुवात आज शनिवार दि.08 जुलै 2023 रोजी सकाळी 11-00 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत या कालावधीत पुर्णा शहरातील आनंद नगर येथे राबविण्यात आहे. 


सुरू असलेल्या या अभियानाच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे ,प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हाध्यक्ष रुपेश भैया सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पहिली सही करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


[मनसेच्या 'एक सही संतापाची' या अभियानात पुर्णा नगर परिषदेचे ब्रँड आंबेसेटर योगेश खंदारे यांनी दोन्ही हात नसतांना देखील आवर्जून उपस्थित राहून आपल्या पायाने स्वाक्षरी करुन संताप व्यक्त केला.]

यावेळी, तालुका अध्यक्ष अनिल बुचाले, शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर,पुर्णा नगर परिषदेचे ब्रँड आंबेसेटर योगेश खंदारे, पवन बोबडे पंकज राठोड, राजेश यादव शेख गुड्डू, मारुती गोडसे भारत बोबडे चक्रधर चव्हाण, रामप्रसाद चव्हाण, इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष अनिल बुचाले व शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर यांनी केले होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या