🌟शेतकरी बांधवांनी भाजीपाला ग्रुपचा अनोखा उपक्रम गटाच्या सदस्याचा वाढदिवस केला छत्री देउन साजरा....!


🌟आपल्या शेतकरी बाधवाचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी भाजीपाला ग्रुपचा कौतुकास्पद उपक्रम🌟 


                  
  
भाजीपाला उत्पादक ग्रुपचे सदस्य व परभणी कृषी विद्यापीठाचे किटकशास्त्रज्ञ डॉ.दिगंबर पटाईत यांचा वाढदिवस नैसर्गिक पपई कापून तसेच शेतकऱ्यांनी स्वत:चे उत्पादित उत्पादन देऊन साजरा केला. व. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकरी बाधवांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी भाजीपाला ग्रुपच्या वतीने पाच शेतकऱ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.


 
यामध्ये ईटलापुर येथील शेतकरी उत्तमराव पुंड. बाळासाहेब पुंड. खानापूर येथील शेतकरी प्रभाकर थोरात  असोला येथील शेतकरी विशाल जावळे.  माखणी येथील शेतकरी परशुराम पुरी या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी भाजीपाला ग्रुपचे सदस्य पंडीतराव थोरात, कृषि पर्यवेक्षक अनिल वडजे, प्रकाश हारकळ, रामेश्वर साबळे, जनार्धन आवरगंड, विजय जंगले आदीची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या