🌟परभणी जिल्ह्यात तारुगव्हाण उच्च पातळी बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सोडणार....!


🌟नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा🌟

परभणी (दि.२१ जुलै २०२३) : जिल्ह्यातील तारुगव्हाण उच्च पातळी बंधाऱ्याच्या वरील बाजूस झालेला पाऊस व ढालेगाव बंधाऱ्यातील विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आज शुक्रवारी रात्री ९ वाजेनंतर बंधाऱ्याच्या पाणीपातळीनुसार आवश्यक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या शेतकरी, नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसेच  विद्युत मोटारी, इतर साहित्य तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावेत. तसेच शेळी, गायी आदी पाळीव जनावरांना नदीपात्रात घेवून जावू नये. तसेच सर्वांनी सतर्क राहून, पाण्यातील विद्युत मोटार, नदीपात्रातील, पात्राजवळ बांधलेले गोठे, घर, येथे असलेली जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत. या कालावधीत कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन परभणीच्या लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या