🌟पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात विविध प्राधिकरणा वरील प्राध्यापकांचा सत्कार....!


🌟प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार🌟

पुर्णा (दि.२६ जुलै २०२३) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात  विद्यापीठांच्या विविध प्राधिकरणावरील निवड झालेल्या प्राध्यापकांचा सत्कार अनुसया शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख तथा सिमेंट सदस्य प्रा. डॉ. विजय भोपाळे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या संशोधन मान्यता समिती (RRC) वर निवड झाली आहे. तर राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या राज्यशास्त्र विषयाच्या संशोधन विद्यार्थी वाटप समिती (RAC) वर  सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. 

तसेच महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागप्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील तत्त्वज्ञान अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. प्रभाकर कीर्तनकार यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या तत्त्वज्ञान अभ्यास मंडळावर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या